Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न; रोहित पवारांनी व्हिडिओद्वारे मांडले गंभीर मुद्दे

Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न; रोहित पवारांनी व्हिडिओद्वारे मांडले गंभीर मुद्दे

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार Rohit Pawar यांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ सादर करत स्फोटाचे कारण आणि ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या मते, विमानात एकच नव्हे तर अनेक स्फोट झाले असावेत आणि यामागे अतिरिक्त इंधन टाक्यांचा मुद्दा असू शकतो.

रोहित पवार यांनी उदाहरण देत सांगितले की, २०२३ मधील एक मोठे विमान रनवेवर कोसळले होते. रनवेचा पृष्ठभाग कडक असल्याने त्याचा परिणाम वेगळा झाला. मात्र अजित पवार यांचे विमान रनवेवर नव्हे तर बाजूच्या मातीच्या भागावर कोसळले. “बॉल फरशीवर टाकला तर जास्त उसळी मारतो, पण मातीत टाकला तर कमी,” असे उदाहरण देत त्यांनी इम्पॅक्ट कमी असायला हवा होता, असा दावा केला. तरीही मोठा स्फोट कसा झाला, हा त्यांचा मुख्य सवाल आहे.

त्यांनी विमानातील फ्यूल टँकच्या रचनेवरही प्रश्न उपस्थित केले. विमानाच्या शेवटच्या भागात, टॉयलेटजवळ अतिरिक्त इंधन टाकी ठेवली जाते आणि त्याच भागात ब्लॅक बॉक्स असतो, असे त्यांनी सांगितले. जर त्या भागापर्यंत आग पोहोचली असेल, तर आधी अतिरिक्त कॅन पेटले आणि नंतर पंखातील इंधनाला आग लागली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

इंधनाच्या प्रमाणाबाबतही त्यांनी गणित मांडले. २५० ते ४०० लिटरपर्यंत इंधन असण्याची शक्यता त्यांनी मांडली असून, मुंबईहून उड्डाण करताना टँक पूर्ण भरलेले होते, असा दावा केला. त्यामुळे अपघाताच्या वेळी इंधनाच्या प्रमाणामुळे स्फोटाची तीव्रता वाढली असावी, असे ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवार किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तपास यंत्रणा अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत. ब्लॅक बॉक्समधील माहिती आणि तांत्रिक अहवाल आल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. तपासाचा अंतिम निष्कर्ष काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com