1 जूलैपासून होणार अनेक मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 जूलैपासून होणार अनेक मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

जून महिना संपत असून जुलैपासून नवीन महिना सुरू होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जून महिना संपत असून जुलैपासून नवीन महिना सुरू होत आहे. अशा परिस्थितीत दरवेळेप्रमाणेच या वेळीही अनेक मोठे बदल होणार आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किमती आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.जुलै महिन्यातील या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असली पाहिजे. १ जुलैपासून तुमच्यासाठी काय बदल होणार आहेत.

देशातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅसची किंमत निश्चित करतात किंवा त्यात सुधारणा करतात. यावेळीही एलपीजी गॅसच्या किमतीत १ तारखेला बदल अपेक्षित आहे. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती, मात्र 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. याच कारणामुळे यावेळी एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

परदेशात क्रेडिटद्वारे खर्च करण्यावर TCS लागू करण्याची तरतूद आहे, जी 1 जुलै 2023 पासून लागू होईल. या अंतर्गत 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20% पर्यंत TCS शुल्क आकारले जाईल, परंतु शिक्षण आणि वैद्यकीयसाठी हे शुल्क 5% पर्यंत कमी केले जाईल. तर, जर तुम्ही परदेशात शैक्षणिक कर्ज घेत असाल तर हे शुल्क आणखी कमी करून ०.५ टक्के केले जाईल.

दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोलियम कंपन्या पहिल्या तारखेला गॅसच्या किमतीत बदल करतात.

प्रत्येक करदात्याला आयटीआर भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जुलैमध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप ITR भरला नसेल तर 31 जुलैपर्यंत फाइल करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com