New Rules : केंद्राचा नवा नियम! व्हॉट्सॲप–टेलिग्रामसाठी आता सिम कार्ड अनिवार्य

New Rules : केंद्राचा नवा नियम! व्हॉट्सॲप–टेलिग्रामसाठी आता सिम कार्ड अनिवार्य

भारत सरकारनं मेसेजिंग ॲप्सच्या वापरासंदर्भात नियम तयार केला आहे. त्या नियमानुसार देशातील कोट्यवधी यूजर्ससाठी ॲप वापरण्याची पद्धत बदलावी लागू शकते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारत सरकारनं मेसेजिंग ॲप्सच्या वापरासंदर्भात नियम तयार केला आहे. त्या नियमानुसार देशातील कोट्यवधी यूजर्ससाठी ॲप वापरण्याची पद्धत बदलावी लागू शकते. नव्या नियमानुसार व्हाटसॲप, टेलीग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओ चॅट,अरटटाई आणि जोश सारखी ॲप सिमकार्ड सुरु असल्याशिवाय सुरु राहू शकणार नाहीत.दूरसंचार विभागानं हे नियम टेलीकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट रुल्स 2025 नुसार लागू केले आहेत.

देशात पहिल्यांदा ॲप आधारित मेसेजिंग प्लॅटफॉर्मला टेलीकॉम सारख्या कठोर नियमावलीत आणलं गेलं आहे. नवा सिम बायंडिंग नियम या ॲपवर देखील लागू असेल. ही व्यवस्था यापूर्वी बँकिंग आणि यूपीआय ॲप साठी लागू होती. त्यामुळं सिमकार्ड सुरु नसेल तर लॉगीन होत नाही. सरकारनं या ॲप्सला टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर यूजर एनटिटी श्रेणीत ठेवलं आहे. आता या प्लॅटफॉर्म्सला हे निश्चित करावं लागेल की ॲप यूजरचं सिम कार्ड सोबत नेहमी संलग्न असावं. ही व्यवस्था 90 दिवसांमध्ये लागू करावी लागेल. वेब ब्राऊजर वापरणाऱ्यांसाठी देखील मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक 6 तासानंतर ऑटो लॉगआऊट होईल. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करुन लॉगीन करता येईल.

सरकारच्या मते गुन्हेगारांना खोटी खाती चालवणं यामुलं अडचणीचं होईल. कारणं प्रत्येक वेळी सक्रिय आणि पडताळणी केलेलं सिमकार्ड आवश्यक होईल. दूरसंचार विभागाच्या मते बहुतांश मेसेजिंग ॲप्स पहिल्यांदा इन्स्टॉल करताना मोबाईल क्रमांकाची पडताळणी करतात. त्यानंतर सिमकार्ड हटवलं तरी ते सुरु राहतं. सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं यामुळं सुरक्षेतील मोठी त्रुटी निर्माण होते. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सिमकार्ड बदलल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर देखील ॲपचा वापर सुरु ठेवतात. त्यांचं लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि कॅरिअर डाटा ट्रेस होत नव्हता.

सायबरतज्ज्ञांच्या मते यामुळं फसवणूक आणि स्पॅम कमी होतील. यामुळं यूजर , नंबर आणि डिव्हाईस ट्रेसिंग सोपी होईल. मात्र, काही जाणकारांच्या मते गुन्हेगार खोट्या कागदपत्रांच्या द्वारे किंवा कागदपत्रांचा गैरवापर करुन सिमकार्ड घेऊ शकतात. मात्र, टेलिकॉम उद्योगाच्या मते भारतात मोबाईल क्रमांक ही सर्वात मजबूत डिजीटल ओळख आहे. या नियमामुळं सायबर सुरक्षा आणखी मजबूत होईल. दरम्यान, कोट्यवधी भारतीयांना त्यांच्या दररोजच्या डिजीटल सवयी बदलाव्या लागतील. कारण आता यूजर्स सहा तासांपेक्षा अधिक काळ व्हाटसॲप वेब सुरु ठेवू शकणार नाहीत. त्यांना सहा तासांनंतर लॉगीन करावं लागेल. जर सिम कार्ड बंद झालं असेल किंवा स्लॉटमध्ये नसेल तर ॲप बंद राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com