Kedarnath
Kedarnath

Kedarnath : केदारनाथ मंदिरात नवी नियमावली जाहीर; मोबाईल फोनवर बंदी

केदारनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kedarnath)केदारनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाविक केदारनाथला दर्शनासाठी येत असतात. यावेळी फोटो, व्हिडिओ, रिल्स काढले जातात.

याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे रांगेत राहून जे दर्शन घेतले जाते त्याला उशिर होतो. याच पार्श्वभूमीवर आता केदारनाथ मंदिरात भाविकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली असून मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंदिर प्रशासनाने दिला असल्याची माहिती मिळत आहे. भाविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • केदारनाथ मंदिरात नवी नियमावली जाहीर

  • मोबाईल फोनवर बंदी

  • कठोर कारवाईचा इशारा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com