Love Jihad VHP : मुंबईत अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? नेमकं काय आहे प्रकरणं

Love Jihad VHP : मुंबईत अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? नेमकं काय आहे प्रकरणं

मुंबईतील एका घटनेने समाजात नवीन वाद निर्माण केला आहे. मुंबईत लव्ह जिहादचा नवा प्रकार समोर आला आहे. बोरिवली येथील एका तरुणीने प्रियकराशी लग्न न करता केवळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट' केल्याने खळबळ उडाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • मुंबईत अॅग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड?

  • बोरिवलीतील 21 वर्षीय तरूणी मुस्लीम तरूणासोबत पळून गेली

  • लग्न न करता तरूणीने केलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट

मुंबईतील एका घटनेने समाजात नवीन वाद निर्माण केला आहे. मुंबईत लव्ह जिहादचा नवा प्रकार समोर आला आहे. बोरिवली येथील एका तरुणीने प्रियकराशी लग्न न करता केवळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट' केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तिने प्रियकराशी विवाह केला नाही, तर फक्त 'रिलेशनशिप अॅग्रीमेंट' करून त्यांची प्रत तिच्या आईच्या मोबाईलवर पाठवली. या प्रकाराला विश्व हिंदू परिषदेने 'लव्ह जिहाद' चा नवीन प्रकार असल्याचे म्हंटले आहे.

बोरिवलीतील 21 वर्षीय तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत असताना शाहिद शेख नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली. मात्र दोघांनी लग्न न करता परस्परांमध्ये रिलेशनशिप एग्रीमेंट करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीयांनी या प्रकरणी विश्व हिंदू परिषद यांची मदत घेतली होती. त्यांच्या हस्तक्षेपानंतर तरुणीला परत आणण्यात यश आलं. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, काही दिवसांनंतर ती तरुणी पुन्हा पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून "एग्रीमेंट रिलेशनशिप"च्या माध्यमातून होत असलेल्या अशा प्रकारांवर पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com