कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट; शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत आर्यन खानचं नाव
Admin

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट; शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत आर्यन खानचं नाव

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आरोपांची चौकशी आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह करत होते. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समीर वानखेडेंवर आर्यन खानला अटक न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे तो म्हणजे. आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं. या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात आली असे आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com