New twist in Gautami Patil accident Case : गौतमी पाटील अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट
New twist in Gautami Patil accident Case : गौतमी पाटील अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, अपघातापूर्वी उतरल्या दोन व्यक्ती; CCTV समोर New twist in Gautami Patil accident Case : गौतमी पाटील अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, अपघातापूर्वी उतरल्या दोन व्यक्ती; CCTV समोर

New twist in Gautami Patil accident Case : गौतमी पाटील अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, अपघातापूर्वी उतरल्या दोन व्यक्ती; CCTV समोर

गौतमी पाटील अपघात: सीसीटीव्ही फुटेजमुळे नवा ट्विस्ट
Published by :
Riddhi Vanne
Published on

गौतमी पाटील यांच्या वाहनाचा ३० सप्टेंबरला पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक मगराळे गंभीर जखमी झाला, तर रिक्षामध्ये असलेले दोन प्रवासीही जखमी झाले. अलीकडील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघातापूर्वीचे नाट्यमय क्षण समोर आले आहेत. व्हिडिओत स्पष्ट दिसते की, गौतमी पाटीलच्या वाहनातील चालकाच्या शेजारी आणि पाठीमागे बसलेली दोन व्यक्ती अपघातापूर्वी गाडीमधून उतरल्यानंतर अपघात घडला. यामुळे अपघातातील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फुटेजनुसार, गौतमी पाटीलचे वाहन भोरकडून मुंबईकडे येत एका पेट्रोल पंपाजवळ उभे होते, आणि त्यापासून काही अंतरावरच रिक्षाला धडक झाली. धडकीत रिक्षाचे मोठे नुकसान झाले, तर रिक्षाचालक मगराळे गंभीर जखमी झाला. जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, प्रकरणात विशेष अधिकारी नेमण्याचे जाहीर केले आहे. पोलिस अपघातानंतर क्रेन कोणी बोलावली, कोणी फोन केला आणि गाडी कुठून आली याचा सखोल तपास करत आहेत. तसेच सर्व उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताची संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रिक्षाचालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांच्या मते, रोज अंदाजे ७० ते ८० हजार रुपये खर्च होत आहेत, आणि आतापर्यंत ५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. भविष्यातही मोठा खर्च होण्याची शक्यता असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर योजनांसाठी संबंधित कागदपत्रेही सादर केली आहेत. गौतमी पाटीलच्या वाहनातील अपघाताचा तपास अद्याप सुरु असून, पुणे पोलिस सर्व पैलूंची सखोल चौकशी करत आहेत आणि अपघातामागील खरी कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com