थर्टीफर्स्टसाठी पोलीसही सज्ज, मुंबईत 100 ठिकाणी नाकाबंदी; हे मार्ग राहणार बंद

थर्टीफर्स्टसाठी पोलीसही सज्ज, मुंबईत 100 ठिकाणी नाकाबंदी; हे मार्ग राहणार बंद

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे. नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. यात तर मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीसही थर्टीफर्स्टच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून 4 पोलीस उपायुक्त, 2000 वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. वाहतूक पोलिसांनी पुन्हा ब्रेथ ॲनालायझर तपासणी सुरू करत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. सेलिब्रेशनच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक पार्किंगसाठी संबंधित आस्थापनाला पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून शहराच्या 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे. तसेच मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी आवश्यकता लागली तर बंद करणार आहेत. त्याचप्रमाणे श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com