Baby Vaccination : जन्मानंतर तुमच्या बाळाचे 'हे' डोस चुकवू नका
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पुढील आयुष्यभर आजारांचा, साथींचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, तसेच विविध देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी काही डोस किंवा लस सुचवलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना, तसेच विविध देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी याबाबत आपापल्या देशात नियम केले आहेत. भारतात जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लशींची माहिती जारी केलेली आहे. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वयाच्या 16 व्या वर्षांपर्यंत लसीकरणाचे वेळापत्रक असते.
या ११ लस घेणे गरजेचे
1. बीसीजी लस - बाळ जन्मतःच किंवा 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत
2. हेपेटायटिस बी - बाळ जन्मतःच
3. पोलिओची तोंडावाटे लस - जन्मतःच, त्यानंतर 6,10,14 आठवड्यांनी
4. पेंटावॅलेंट लस - 6, 10 आणि 14 व्या आठवड्यात
5. रोटाव्हायरस लस - 6,10, 14 व्या आठवड्यात
6. एफआयपीव्ही - 6 व्या आणि 14 व्या आठवड्यात
7. मिझल्स रुबेला लस - 9 ते 12 महिने, 16 ते 24 महिने
8. डीपीटी लस - 16 ते 24 महिने आणि 5-6 वर्षे
9. टीडी लस - पहिला डोस 10 वर्षे आणि दुसरा डोस 16 वर्षे
10. पीसीव्ही लस - पहिला डोस- 6 आठवडे, दुसरा डोस- 14 आठवडे
11. जेई लस - पहिला डोस-9 ते 12 महिने, दुसरा डोस 16-24 महिने