नवनियुक्त राज्यपाल बैस शनिवारी शपथ घेणार

नवनियुक्त राज्यपाल बैस शनिवारी शपथ घेणार

नवनियुक्त राज्यपाल बैस शनिवारी शपथ घेणार आहेत.

नवनियुक्त राज्यपाल बैस शनिवारी शपथ घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा 12 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला.यापूर्वी रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर बैस हे शुक्रवारी प्रथमच मुंबईत येत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला हे बैस यांना पदाची शपथ देतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. राजभवनमधील दरबार हॉलमध्ये येत्या शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी हा शपथविधी सोहळा होईल.

निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे न‍िरोप देण्यात आला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. शुक्रवारी, राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते डेहराडूनकडे प्रस्थान करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com