Abhijit bichukale
Abhijit bichukaleTeam Lokshahi

अभिजीत बिचुकले यांचा अपघात, डोक्याला दुखापत

अभिजीत बिचुकलेंसोबत प्रवास करणारे ४ मित्र देखील जमखी झाले आहेत.
Published by :
Sagar Pradhan

अमोल धर्माधिकारी|पुणे: बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा पुण्यात अपघात झालाय. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या सोबत प्रवास करणारे ४ मित्र देखील जमखी झाले आहेत. अपघातानंतर बिचकुले यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अभिजीत बिचुकले मुळचे सातारा शहरातील आहेत. मात्र पेढ्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने ते पुण्यात राहतात. पुण्यातील शुक्रवार पेठेत त्यांचं पेढ्याचं दुकान आहे. दररोज पुणे शहरात त्यांचं हिंडणं-फिरणं असतं. आज दुपारी शहरातच प्रवासादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या गाडीत त्यांचे ४ मित्र प्रवास करत होते. चौघांनाही किरकोळ दुखापत झाली, प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com