मुंब्रामध्ये डोंगरावर आग लागल्याची घटना
बायपास गावदेवी मंदिरा जवळील डोंगरावर आग
अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या शारवी बार हॉटेलच्या किचनमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून धुराचे लोट दूरवरून दिसत होते. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
अमेरिकेमधील जॉर्जिया राज्यात एका विमानाचा अपघात मोठा अपघात टळला. गैनेस्विल ली गिल्मर मेमोरियल एअरपोर्टवरून या विमानाने उड्डाण केले होते. ते कँटनमधील चेरोकी काऊंटी प्रादेशिक विमानतळावर उतरणार होते. पण, त्यापूर्वीच त्यात बिघाड झाला आणि विमानाचे लँडिंग करावे लागले.
नाशिक गटनेता-उपमहापौर पदावरून शिवसेनेत मतभेद
बैठकीत नाराजी नाट्यावर तोडगा काढणार
'नगरसेवकांचा सत्कार शिंदेंच्या हस्ते होणार'
विश्वसनीय सूत्रांची 'लोकशाही'ला माहिती
राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडला जाणार
होळीसाठी शनिवार आणि रविवार पकडून सलग 5 दिवसांची सुट्टी असणार
2 मार्च ते 4 मार्च दरम्यान होळीकरीता कामकाज होणार नाही
सोबतच, जयंत पाटील देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत
जयंत पाटील व्यक्तिगत कामासाठी गेले असल्याची माहिती
विधानभवनातील दालनात भेट होणार
पवार कुटुंबीयांकडून अजित पवार यांच्या शोकसभेचे मुंबईत आयोजन करायचे आहे
त्यानिमित्ताने वेळेसाठी भेटीला आले असल्याची माहिती
सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार
नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी केले दाखल
नारायण राणे यांची प्रकृती स्थिर
मी माझ्या कुटुंबासाठी राजकारण सोडलं… राजकीय जीवनाचा कुटुंबावर परिणाम होऊ नये, यासाठी राजकारणातू बाहेर पडलो.. गोविंदा यांची प्रतिक्रीया
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
रत्नपुर येथे एमआयडीसीसाठी 1 हजार एकर जागा देण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
कॅबिनेटमध्ये अजित पवारांच्या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर एकमत
इंदापूर रत्नापुरी वालचंदनगर येथे MIDC ला परवानगी, जागा देण्यात आली
महाराष्ट्रात 11 अतिरिक्त कलेक्टर पोस्ट करण्यात येणार
पोस्टिंगच्या निर्णयाला अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला होता..
बारामती येथे क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपये मंजूर
चंद्रपूरच्या महापौर आणि उपमहापौरपदी भाजप सेना युतीचे वर्चस्व स्थापित झाल्यानंतर लगेच सुधीर मुनगंटीवार यांना किंगमेकर ठरवणारे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले. भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी या विजयाचे श्रेय सुधीर मुनगंटीवार यांना दिले असून, त्यांच्यामुळेच हा अशक्यप्राय विजय साकार झाला, असे भोंगळे म्हणाले. भोंगळे हे मुनगंटीवार यांचे विश्वासू समजले जातात.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
स्टेडियम साठी महसूल विभागाकडून १२ हेक्टर जागा उपलब्ध करून देणार
राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूरातील विकास वाडी येथे होणार स्टेडियम
राज्यातील क्रीडा पट्टूंसाठी मोठी पर्वणी
राज्य सरकार करणार आंबा नुकसानीच्या अभ्यास गटाची स्थापना
मंत्री नितेश राणेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मोहर व आंबे गळून पडल्याने आंबा उत्पादक चिंतेत
आंबा उत्पादकांच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी मागितली माहिती
अभ्यास गटाची माहिती मिळताच निर्णयासाठीही बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर–नाशिक रोड परिसरात सापळा रचून अधिकाऱ्यांनी एका ट्रकची तपासणी केली.
या तपासणीत तब्बल १८० मिलीच्या ६५ पेट्या, म्हणजेच हजारो बाटल्या विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकसह लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. जिल्ह्यातील १३३ रिक्त जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यासाठी होणाऱ्या मैदानी चाचणीची सर्व तयारी पोलीस प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.
वाशिमच्या मंगरुळपीर येथील बिरबलनाथ महाराज यात्रेत ‘डान्स’च्या नावाखाली अश्लील नृत्याचे आरोप झाल्यानंतर पोलीस प्रशासनाची बाजू समोर आली आहे. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितलं की आयोजकांना केवळ लोककला कार्यक्रमाचीच परवानगी होती, मात्र त्या परवानगीचा दुरुपयोग करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसडीपीओ स्तरावर चर्चा झाली असून तत्काळ डान्सचे कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले असून अटींचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत...
तब्बल 6 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक.. घराजवळील ड्रेनेजचे काम करण्यासाठी उकळले पैसे..
कोल्हापूर सर्किट बेंच समोर भलं मोठं झाड कोसळलं असून दोन दुचाकीवर हे झाडं कोसळलं आहे. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवतीर्थवर मनसेची महत्त्वाची बैठक असून राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
धाराशिवमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली असून 16 हजार 538 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
अभिनेता शाहिद कपूरच्या चित्रपटाला दिलासा मिळाला असून 'ओ रोमियो' प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. सकाळी 10 वाजता मंत्रालयात त्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील.