Latest Marathi News Update live : केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात उद्या भारत बंद

Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Byculla: मुंबईच्या भायखळ्यातील जयकृपा सोसायटीची लिफ्ट कोसळली

भायखळ्यातील जयकृपा सोसायटीची लिफ्ट कोसळली

पाच रहिवासी गंभीर जखमी

चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली

महापौर बंगल्यापासून १०० मीटर अंतरावरील दुर्घटना

ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत 2026-27 च्या वार्षिक योजनांना मंजुरी

ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन 2026-27 च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपयोजना 140 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 107कोटी अशा तरतुदींसह सुमारे 1700 कोटी प्रस्तावीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकाराची संवाद साधताना बोलत होते.

भिवंडी मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी वय 20 वर्ष व उजेर अहमद इस्लाहुर रहमान खान वय 20 वर्ष दोघेही रा. न्यू आजाद,नगर शांतीनगर असे अटक आरोपींची नावे आहेत.

बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन

13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्सपो

परळीच्या ओपळे मैदानावर होतेय जय्यत तयारी

विविध प्रकारचे 300 स्टॉल्स, 45 हून अधिक स्पर्धा

विविध राज्यातील दुर्मिळ पशूंच्या जाती, प्रजातीचे प्रदर्शन

छ. संभाजीनगर सहावीतील मुलावर अत्याचाराचा आरोप

4 मुलांनी मिळून मित्रावर अत्याचार केल्याचा आरोप

हा कथित प्रकार एका नामांकित शाळेत झाल्याचा आरोप

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी सुरू केल्याची माहिती

खासदार श्रीकांत शिंदेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं समर्थन

'देशातील विकासाची नवी दालने खुली करणारा अर्थसंकल्प'

'देशाची तिसरी महासत्ता बनण्याकडे वाटचाल'

केंद्रीय अर्थसंकल्पावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Nanded: पाठबंधारे विभागातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पाटबंधारे विभागातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नांदेड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.

किमान वेतन कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना वेतन लागू असताना शासनाकडून केवळ ३०० रुपये रोजंदारीप्रमाणे काम करून घेतले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

तसेच मागील चार ते पाच महिन्यांपासून वेतनही मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे

Bharat Band: केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात उद्या भारत बंद

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात उद्या देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.

या संपाला शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने देशभरात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आयोजकांच्या दाव्यानुसार, या आंदोलनात सुमारे 30 कोटींहून अधिक कामगार सहभागी होणार आहेत.

Nanded: नांदेडमध्ये पाटबंधारे विभागातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

पाटबंधारे विभागातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नांदेड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.

किमान वेतन कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना वेतन लागू असताना शासनाकडून केवळ ३०० रुपये रोजंदारीप्रमाणे काम करून घेतले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

तसेच मागील चार ते पाच महिन्यांपासून वेतनही मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन...महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडींकडून बाळासाहेबांना अभिवादन...

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असून संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. या भेटीदरम्यान प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला वेग

धाराशिव जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला वेग आल्याचे पाहायला मिळत असून 148 रिक्त जागांसाठी तब्बल 15 हजार अर्ज आले आहेत.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शाहांमध्ये बैठक संपन्न

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शाहांमध्ये बैठक संपन्न झाली असून सुनेत्रा पवार आणि अमित शाहांमध्ये 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Rohit Pawar : रोहित पवार अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता

रोहित पवार आज अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता असून आज 4 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडीओ समोर

अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडीओ समोर आला असून विमान लँडिंगवेळी झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Devendra Fadnavis :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला असून जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे.

Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Rohit Pawar :  रोहित पवार आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार

रोहित पवार आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार असून ते या पत्रकार परिषदेमधून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune : दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

सिंहगड रस्ता परिसरासह शहराच्या दक्षिण भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्र-टप्पा एकमधील जलवाहिनीवर बंद प्लेट बसविण्यात येणार आहे.

Mumbai : मुंबईत 2011 तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण; आरोपी नदीम शेखला जामीन मंजूर

Washim : वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी

वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने मानोरा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांवर अचानक धाड टाकत तब्बल १९ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले.

Nashik : नाशिकच्या सिडको भागात पुढचे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

नाशिकच्या सिडको भागात पुढचे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सिडको भागात असलेल्या जलकुंभाचे दुरुस्तीचे काम होणार असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Rohit Pawar : रोहित पवार दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर

रोहित पवार दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर असताना रोहित पवार दिल्लीत राजकीय भेट घेणार असून शरद पवार यांच्या जवळच्या लोकांना ते भेटणार आहेत.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

सुनेत्रा पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com