Latest Marathi News Update live : भिवंडीतील निंबवलीमध्ये अनाधिकृत बांधकामावर MMRA ची कारवाई

Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Mumbai : मुंबई-एमएमआर प्रदूषणावर न्यायालयाचा कडक पवित्रा!

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे.

Weather Update : पुढील पाच दिवसांत तापमान वाढीचा इशारा; फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची झळ

फेब्रुवारी महिना सुरू होताच राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत किमान तसेच कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai : मोठी दुर्घटना टळली; मुंबई एअरपोर्टवरील धावपट्टीवरच विमानांची टक्कर

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता टळली. मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावर; प्रचारसभांचे आयोजन

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Virar : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; फळ विक्रेत्याकडून फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव, विरारमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

विरारमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विरारमधील फळ विक्रेता फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव करत असल्याचे समोर आले आहे. चक्क गटारातील पाणी फळांवर टाकून ते विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत असून एका जागरूक नागरिकाने हा प्रकार समोर आणला आहे.

Pune : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार; कार चालकाने महिलेला उडवलं

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. सीएनजी पंपावर उभा असलेल्या महिलेला कार चालकाने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Devendra Fadnavis : सरकारी विभागांमधून होणाऱ्या अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी विभागांमधून होणाऱ्या अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

Weather Update : कधी थंडी, कधी पाऊस; फेब्रुवारीतच हवामानात मोठी उलथापालथ

राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी पावसाची शक्यता, तर कधी अचानक उकाडा अशा विचित्र स्थितीमुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले.

Sunil Kedar : नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा

नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती मिळत असून प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

Ganesh Festival : उंच मूर्ती विसर्जन नियम मार्चमध्ये संपणार; शाडू मातीच्या मूर्तींसाठी मूर्तिकारांची धावपळ

उंच गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित करण्यास दिलेली सशर्त परवानगी येत्या मार्च महिन्यात संपणार असून, याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, उंच मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाला केवळ मार्चपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

Farmers : येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कांद्याला कवडीमोल भाव, शेतकरी संतप्त

येवल्यात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे इंदोर महामार्गावर सुमारे एक तासापासून रस्ता रोखून धरल्याचे पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीसांचा हस्तक्षेप', शरद पवारांचा थेट सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजित पवारांनी भाजपला माहिती दिली असती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्यावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक निर्णय, तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार

लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेमुळे थांबलेला तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत.

Mumbai: मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

मुंबई काँग्रेस कार्यालया बाहेर आंदोलन

पोलिसांकडून आक्रमक कार्यकर्त्यांची धरपकड

काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

लोकसभेत राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही

अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलसाठी जागा मंजूर

अलियाबाद येथील ११.२९ हेक्टर जागेचा ताबा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास प्रदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

१०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय उभारणार

महसूल विभागाचा निर्णय जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या

याबाबत बसून निर्णय घेऊ - फडणवीस

राहुल गांधींच्या आरोपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

राहुल गांधींना बोलायचे नसून खोटे आरोप करायचे आहेत

राहुल गांधींना आपल्या देशाला, लष्कराला बदनाम करायचे आहे

राहुल गांधी हे फक्त चर्चेत राहण्यासाठी दावे करत आहेत

दिवंगत अस्थिकलश पुण्यातल्या बालगंधर्वरंग मंदिरात

अजित पवार यांचा अस्थिकलश पुण्यातल्या बालगंधर्वरंग मंदिरात

अजित पवार यांच्या स्मरणार्थ आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शोक सभेचे आयोजन

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते शोक सभेसाठी राहणार उपस्थित

त्या आधी अस्थी कलश हा ठेवण्यात आला असून दर्शन घेत आहेत

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी देहरादून येथील त्यांच्या निवासस्थानी शाल आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आणि अभिनंदन केले.

Goregaon: गोरेगावमधील इमारतीच्या लिफ्टमध्ये आग

गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे.

हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो

नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik: नाशिकमध्ये गिरीश महाजनांविरोधात मोर्चा

- नाशिक रोड पासून मोर्चा ला सुरवात

- 26 जानेवारी ला आपल्या भाषणात गिरीश महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने मोर्चा

- मोर्चात विविध संघटना सहभागी

- हजारो आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी

- नाशिकरोड पासून पायी काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा

भिवंडीतील निंबवली येथील अनधिकृत बांधकामावर एम एम आर डी ए ची करवाई

भिवंडी तालुक्यातील मौजे निंबवली गावाच्या हद्दीत सर्वे नंबर 60 /10 वर अनाधिकृत पणे उभारण्यात आलेल्या 10 ते 12 गाळ्यांवर एम एम आर डी ए च्या वतीने जेसीबी च्या साहय्याने तोडक कारवाई करण्यात आली.MMRDA चे व्यवस्थापक प्रफुल्ल कांबळे,तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

भिवंडीतील निंबवलीमध्ये अनाधिकृत बांधकामावर MMRA ची कारवाई

भिवंडी तालुक्यातील मौजे निंबवली गावाच्या हद्दीत सर्वे नंबर 60 /10 वर अनाधिकृत पणे उभारण्यात आलेल्या 10 ते 12 गाळ्यांवर एम एम आर डी ए च्या वतीने जेसीबी च्या साहय्याने तोडक कारवाई करण्यात आली.MMRDA चे व्यवस्थापक प्रफुल्ल कांबळे,तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली

अमरावतीच्या मेळघाटातील रोजगार हमीचे कामे बंद

अमरावतीच्या मेळघाट मध्ये आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्याने राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे दिल्या जाते.. याच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो..

चंद्रपुरातील काँग्रेसच्या वादावर मोठा निर्णय

विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला अडीच वर्षांचा महापौर मिळणार

पहिली अडीच वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर मिळणार

तर उर्वरित अडीच वर्षांमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या गटाला महापौर दिला जाणार

पाच वर्ष काँग्रेसकडे महापौर पद राहील तर शिवसेना ठाकरे गटाकडे स्टॅंडिंग कमिटी राहणार

दोन गटांमध्ये महापौर कोणाचा यावरून निर्माण झालेला वाद थेट दिल्लीतील पक्षी श्रेष्ठींकडे गेला होता

अजित पवार विमान अपघात दुर्घटना प्रकरण

ब्लॅक बॉक्समधील माहिती बाहेर येण्यास वेळ लागणार ...दोन दिवसात ब्लँक बॉक्समधील डाटा डाउनलोड करायला सुरुवात होईल ...त्यांनतर नागरी विमान महासंचलनालय माहिती घोषित करणार .. लोकशाही मराठीला सूत्रांचा माहिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com