- एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान...
- मिराबाई कांबळेंची पक्षातून हकालपट्टी... नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना एमआयएमचे पत्र
नागपूरच्या अॅडव्हान्टेज विदर्भ मध्ये झाला हा करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींची उपस्थिती
महिंद्रा अँड महिंद्रा करणार 15 हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर, इगतपुरी आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांत होणार गुंतवणूक
इलेक्ट्रीक वाहने, हलकी, मध्यम, अवजड व्यावसायिक वाहने
ट्रॅक्टर, शेती यंत्रसामुग्री यात महिंद्रा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वाहनांची निर्मिती करणार
15 हजार रोजगार यातून निर्माण होणार
यंदा विठ्ठलाची वारी ही थीम साकारण्यात आली आहे
प्रताप सरनाईक फाउंडेशन च्या वतीने अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सव 2026 चा भव्य उद्घाटन सोहळा आज ठाणे महानगरपालिकेचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता उपवन तलाव परिसरात झाले...
उपवन तलाव परिसरातील गणपती मंदिरापासून महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कला परेड सादर करण्यात आली..
अंडर नाईन्टीन वर्ल्डकप मध्ये भारताचा विजय झाला आणि भारतासाठी खेळणारी अंडर 19 ची टीम चा कॅप्टन असलेला आयुष्य मात्रे हा वसईचा राहणार असून वसईच्या घराघरात सध्या जल्लोष सुरू आहे आयुष्य
नागपूरच्या अॅडव्हान्टेज विदर्भ मध्ये झाला हा करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींची उपस्थिती
महिंद्रा अँड महिंद्रा करणार 15 हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर, इगतपुरी आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांत होणार गुंतवणूक
इलेक्ट्रीक वाहने, हलकी, मध्यम, अवजड व्यावसायिक वाहने
ट्रॅक्टर, शेती यंत्रसामुग्री यात महिंद्रा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वाहनांची निर्मिती करणार
15 हजार रोजगार यातून निर्माण होणार
जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीसाठी उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी आज मावळ तहसीलदार कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी पोलिस , गौरी गर्जे वकील सुबीर सरकार आणि आरोपीचे वकील मंगेश देशमुख यांनी युक्तिवाद केला
यावेळी पोलिसांनी त्यांच्या युक्तिवादात आमच्याकडे काही अनंत यांच्या ऑडिओ क्लिप असल्याचे सांगितले.
या ऑडिओ क्लिप मध्ये अनंत यानेच एक रेकॉर्ड केलेली २० मिनिटांची क्लिप आहे
‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ अगरबत्तीविरोधात कारवाईचे आदेश…साठवणूक आणि विक्री तातडीने थांबवण्याचे निर्देश
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध भागांसाठी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पुढील ४८ तास हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसासोबतच बर्फवृष्टी, धुकं आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले आहेत.
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराची अधिकृत मुदत संपली असून प्रचाराची धामधूम आता थांबलेली आहे. मात्र, प्रचार बंद झाल्यानंतरही वैयक्तिक भेटीगाठी, घराघरांत संपर्क आणि छुप्या प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
धुळे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ता मिळवली आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौरपदी भाजपाच्याच ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली आहे. या विजयासह धुळे महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या दुःखद घटनेनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अजित पवार यांच्याकडे असलेली बहुतेक खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अर्थ खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. तसेच पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेवर मोठा बदल घडणार आहे. गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानच्या लोकल ट्रेन सेवा सुमारे तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हे पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ब्लॉकमुळे होत आहे. या कामात विशेषतः वांद्रे-खार उड्डाणपुलाचे पाडणे आणि पुनर्बांधणीचा समावेश आहे, जे हा प्रकल्पातील सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, या अधिवेशनात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कामकाजात अडथळा आणला. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवार, ९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले.
नाशिक महापालिकेचा महापौर, उपमहापौर बिनविरोध निवड झाली असून भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदेंची निवड करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमधील महापौर, उपमहापौरपदाची बिनविरोध निवड करण्यात आली असून सव्वा वर्षाचा फॉर्मुला ठरला आहे.
जळगावच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळेंची निवड करण्यात आली असून उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार असून महापौरपदासह उपमहापौर पदावर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे.
अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची चौकशी करण्यात येत असून प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले याबाबत खाजगी सचिवांची CID चौकशी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत.
उद्या ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ॲप आधारित सर्व टॅक्सी सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.