पुणे महानगरपालिकेतील सत्तासमीकरणाचा निर्णय घेणारी महत्त्वाची घडी उद्या, सोमवारी येऊन ठेपली आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, यावर पुढील प्रशासकीय आणि विकासात्मक दिशा ठरणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अजित पवार यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर केला आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये काठ्या आणि तलवारीचाही वापर केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन सोहळा असून राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
मुंबईत मंगळवारी 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार असून वांद्रे पश्चिमेत पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावतीच्या कार्यकारी संचालकपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली असून माजी विश्वस्तांविरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भारत फ्रान्सकडून 100 राफेलची खरेदी करणार असून पी-8 आय टेहळणी विमान, नौदल शस्त्रांचीही खरेदी करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक दिली. अपघात करणाऱ्या कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट असल्याने खळबळ उडाली आहे.
सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ उडाली असून काही लोक EVM मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी आरोप केला आहे.
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1 वाजता चांदवड येथे जैन समाजाच्या नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत