Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल; कोण मारणार बाजी?

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE  : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल; कोण मारणार बाजी?

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : मंत्री दत्तात्रय भरणेंच्या चिरंजीवाचा विजय

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांचा दणदणीत विजय..

इंदापूर तालुक्यातील बोरी गणातून विजयी..

तब्बल 9776 मतांनी विजयी..

भाजपचे सचिन धापटे यांचा केला पराभव..

Ratnagiri: रत्नागिरीच्या दापोली-खेड-मंडणगडमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय

दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने दणदणीत यश मिळवत मतदारसंघातील बालेकिल्ला कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.

Konkan: कोकण रेल्वेमार्गावर धावणा-या वंदेभारत ट्रेनची भटक्या पाळीव जनावरांना धडक

धडकेत तीन गुरांचा मृत्यू

धडक बसल्यानंतर वंदे भारत ट्रेनच्या इंजिनात बिघाड

दिडतास वंदेभारत कुडाळ रेल्वे स्थानकात पडली अडकून

प्रवाशांचा खोळंबा.. दिड तासानंतर दुसरे इंजीन जोडल्यानंतर वंदे भारत मुंबईच्या दिशेने रवाना

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची झालीय... या गटाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सरिता शंकर भिसे यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांच्या जाऊबाई आशाताई शिवाजी भिसे या उभ्या होत्या... या निवडणुकीत काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी थोरल्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी या पराभव केला आहे...

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा दणदणीत विजय

इंदापूर तालुक्यातील बावडा - लुमेवाडी गटातून विजयी..

तब्बल 15755 मतांनी विजयी..

भाजपच्या अंजली घोगरे यांचा केला पराभव..

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसला सर्वाधिक जागा.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा लोकांनी निवडून दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला पडलेले मतदान ही लक्षणीय वाढ झाली आहे... लातूर जिल्हा परिषदेत 23 जणांवर काँग्रेस पक्ष विजयी झाला असून, मतदारांनी हा जो कौल दिला आहे,त्याचे मी स्वागत करतो असे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे

Yavatamal: यवतमाळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

राळेगाव शहरातील अतिक्रमधारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळावेत, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर १ हजार नागरिकाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात गोरगरीब कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक व घरकुल लाभार्थी माता-भगिनींनी सहभाग झाले होते ज्या ठिकाणी नागरिक राहतात, तिथेच त्यांना घरकुल उपलब्ध व्हावे, असा मुख्य उद्देश होता.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : धाराशिव जिल्ह्यात ढोकी पंचायत समिती निवडणुकीत एका मताने विजयी 

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती निवडणुकीत एका मताने झालेल्या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ढोकी पंचायत समितीतून ठाकरे गटाने अवघ्या एका मताने विजय मिळवला. ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांना 3187 मते मिळाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान ढोकी पंचायत समितीच्या मतमोजणी दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळाली. ढोकी पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे यांना ३१८७ मते मिळाली. अवघ्या एकाच मताने थरारक विजय मिळवला.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : पनवेलमध्ये भाजपची जोरदार मुसंडी

पनवेलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत 8 पैकी 8 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी

पनवेल मध्ये पंचायत समिती 16 पैकी 15 भाजप तर एक ठाकरे गटाचे उमेदवार विजयी

भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्त्वात भाजपची जोरदार मुसंडी

कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगर मध्ये भाजपकडून जल्लोष

*भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड*

मोहोळ तालुक्यात भाजपला मोठे यश

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  भाजपने उमेदवारी नाकारली,शिंदे सेनेत जाऊन मिळवला विजय 

भाजपाचे माजी नेते राधाकृष्ण पठाडे यांनी पक्षाला राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पठाडे विजयी झाले आहेत. निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपने मला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी केले, असे मतही राधाकृष्ण पठाडे यांनी व्यक्त केले.विजयानंतर राधाकृष्ण पठाडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : धाराशिवमध्ये समाजवादी पक्षाची दमदार एन्ट्री; बहीण-भावाचा दणदणीत विजय 

धाराशिव जिल्ह्यात समाजवादी पक्षाने राजकीय खाते उघडले आहे. मंगरूळ जिल्हा परिषद गटातून सीमा माडजे-रोचकरी तर तुळजापूर तालुक्यातील आरळी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकरी विजयी झाले. बहीण-भावाच्या या विजयामुळे समाजवादी पक्षाची जिल्ह्यात दमदार एन्ट्री झाली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  निंबवडे गटात भाजपची सरशी; माधवी पडळकर 980 मतांनी विज

आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा 980 मतांनी पराभव केला. या विजयामुळे पडळकर कुटुंबाचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Mumbai BMC : 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर; रितू तावडे 11 फेब्रुवारीला विराजमान 

मुंबई महापौरपदाची अधिकृत घोषणा 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर विराजमान होणार असून रितू तावडे बिनविरोध महापौर बनणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  कुरुल ZP गटात भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील पराभूत 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा 1 हजार 303 मतांनी पराभव झाला असून भाजपचे उमेदवार सचिन जाधव विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   लातूर जिल्हा परिषद अंतिम निकाल: काँग्रेस अव्वल, भाजप दुसऱ्या क्रमांकावर 

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 59 पैकी 23 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 18, राष्ट्रवादीला 12 तर इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  धाराशिव 51 जागांचे चित्र स्पष्ट, भाजप आघाडीवर; शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत 55 पैकी 51 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप 16 जागांसह आघाडीवर असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गट 7, राष्ट्रवादी 5, अपक्ष 4, काँग्रेस 3 तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला घवघवीत यश... 

बारामतीत जिल्हा परिषद गटाच्या सहाची सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला यश आले असून पंचायत समिती गणाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपाला सुपा गणातून एक जागा तर शिरसुफळ गणातून एक जागा सोडली होती. तर दहा जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे केले होते. या सर्व जागांवरील उमेदवार विजयी झाले आहेत. 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराकरिता बारामतीला अजित पवार येत असताना त्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर बारामतीत कसली प्रचार सभा घेण्यात आली नव्हती.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : उदगीर–जळकोटमध्ये महायुतीचा विजय; संजय बनसोडेंकडून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा

 उदगीर व जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे स्वागत करत आमदार संजय बनसोडे यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू, असा शब्द दिला. हा विजय राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना समर्पित असल्याचे सांगत त्यांनी “अजितदादा अमर रहे”च्या घोषणा दिल्या. 

Board Exam : दहावी–बारावीच्या परीक्षांवर सीसीटीव्ही व ड्रोनची कडक नजर 

उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावी–बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकारांसाठी मदत करणाऱ्या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  बार्शीत भाजपचा क्लीन स्वीप, महाआघाडीचा दारुण पराभव

बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ६ आणि पंचायत समितीच्या १२ पैकी १२ जागांवर भाजपने बाजी मारली. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढूनही महाआघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला असून ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   लातूर जिल्हा परिषद निकाल जाहीर, काँग्रेस आघाडीवर

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून ५७ जागांचे निकाल समोर आले आहेत. काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. भाजप १८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या असून इतर पक्षांना मर्यादित यश मिळाले आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   कोरोची जिल्हा परिषदेत सानिका आवडे विजयी

कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल आवडे यांच्या कन्या सानिका आवडे यांनी विजय मिळवला आहे. सानिकाच्या रुपाने आवाडे कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली असून या विजयामुळे आवाडे कुटुंबाच्या राजकीय परंपरेला नवी धार मिळाली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  केसर जवळगा गणातून आकांक्षा चौगुले विजयी 

केसर जवळगा गणातून शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी विजय मिळवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. हा विजय जनतेच्या विश्वासाचा असून सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते आणि मतदारांचे आभारही त्यांनी मानले.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   सांगली पंचायत समिती निकाल जाहीर, तालुकानिहाय वेगवेगळे चित्र 

सांगली जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले असून विविध तालुक्यांत वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मिरजमध्ये भाजप आघाडीवर, वाळव्यात राष्ट्रवादी शरद पवार गट, जत मध्ये भाजप तर खानापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाने सर्व जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  अजित पवारांच्या निधनामुळे जल्लोष टाळला – महायुती 

निवडणूक निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी भराडी आईचे आभार मानले. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे प्रचार व जल्लोष टाळल्याचे सांगत, मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विचारधारेचा विजय झाल्याचा दावा करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालांत महायुतीची सत्ता स्पष्ट होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   फर्दापूर गटात माहीन मुलतानी यांचा दणदणीत विजय फर्दापूर गटात माहीन मुलतानी यांचा दणदणीत विजय 

भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्या कन्या माहीन इद्रीस मुलतानी यांनी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गटातून दणदणीत विजय मिळवला आहे. माहीन मुलतानी यांनी प्रतिस्पर्ध्यांचा ४७३१ मतांनी पराभव करत भाजपची ताकद पुन्हा सिद्ध केली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत दणदणीत विजय 

सांगली जिल्ह्यातील बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत क्रांती पक्षाच्या उमेदवार मोहिनीताई सागर खोत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई असलेल्या मोहिनी खोत यांच्या विजयामुळे रयत क्रांती संघटनेच्या कुटुंबीय राजकारणातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  गोपाळपूर गटात दुर्गाताई अंकुशराव यांचा दणदणीत विजय

सोलापूर जिल्ह्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार दुर्गाताई गोपाळ अंकुशराव यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असल्याने दुर्गाताई अंकुशराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : आंधळी गटात सोनल गोरे यांचा विक्रमी विजय

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांनी भाजपच्या आंधळी गटातून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी विक्रमी १८ हजार मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा तीव्र विरोध होता.

Nilesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालावर निलेश राणेंची ठाम प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकालावर आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. गेली २७ वर्षे जिल्हा परिषद पारदर्शकपणे चालवली असून पुढील पाच वर्षांत राणेसाहेबांच्या नावाला डाग लागेल असे कोणतेही काम होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक नंबर ठेवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : सिल्लोडमध्ये निकालावेळी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

सिल्लोड येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर होत असताना मतमोजणी केंद्रावर विजयी समर्थकांकडून जोरदार हूल्लडबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Ravindra Chavan : महायुतीच्या एकत्रित कामाचे फळ – रविंद्र चव्हाण 

महायुतीने एकत्रितपणे केलेल्या कामाचे हे यश असल्याचे भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता आणि विचारधारेसाठी अथक मेहनत घेतात, असे ते म्हणाले. मात्र अजितदादांच्या निधनामुळे विजयाचा जल्लोष करणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांचे आंगणेवाडी भराडी मातेचे दर्शन

मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंगणेवाडी भराडी मातेचे दर्शन घेतले. देवीवर राज्यातील जनतेचा प्रचंड विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. यावे वर्षभर मागण्या पूर्ण होतात, पुढील वर्षी नवस फेडला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भाजपवर टीका करत सध्याच्या निवडणूक पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   कोकरूड गटात साईतेजस्वी देशमुख यांचा दणदणीत विजय

शिराळा तालुक्यातील कोकरूड जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी सत्यजित देशमुख विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विनोद पन्हाळकर यांचा ४७०० मतांनी पराभव केला. साईतेजस्वी देशमुख यांनी महायुतीच्या जनस्वराज्य मित्र पक्षातून निवडणूक लढवली होती.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

जिल्हा परिषद निवडणुकांतील यशानंतर आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या विजयी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. विजयाचा आनंद साजरा करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : कारेगावमध्ये माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. कारेगाव–कान्हूर मेसाई गणात भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी नवलेंचा पराभव करत विजय मिळवला.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  ‘मौत टक करके आया’ – सचिन गरड 

संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी शिंदे गटाच्या हनुमंत भोंदवे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. “मौत टक करके आया” म्हणत गरड यांनी थरारक विजय साजरा केला. निवडीनंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  कवठा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे महेश देशमुख विजयी 

कवठा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा विजय मतदारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  धाराशिवमध्ये अर्चना पाटील विजयी, सक्षणा सलगरांचा पराभव 

धाराशिव जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा पराभव केला. पराभवानंतर सक्षणा सलगर यांनी ‘ओमराजे निंबाळकरांचं गावकीपेक्षा भावकीवर लक्ष’ असल्याची टीका केली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  मावळचा दणदणीत विजय अजित पवारांना समर्पित 

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या १० आणि जिल्हा परिषदेच्या ५ जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय मावळच्या जनतेचा असून अजित पवार यांना समर्पित असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. निर्विवाद सत्तेनंतर ते भावुक झाले.

Navi Mumbai : नवी मुंबईत ५२७ जागांसाठी पोलीस भरती

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ५२७ रिक्त जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी तब्बल ५० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांसाठी बुधवारपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने तरुण सहभागी होणार आहेत.

BMC : मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्ष कार्यालय पुन्हा ताब्यात

मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या पाहणीसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते व नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट दिली. सध्या अंतिम टप्प्यात असलेले हे कार्यालय लवकरच काँग्रेसच्या ताब्यात येणार आहे. याआधी हे कार्यालय शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आले होते. यामागचे कारण आणि महापालिकेतील पुढील भूमिका यावर उपनेते आश्रफ अझमी यांनी प्रतिक्रिया दिली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  सोलापुरात धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपचा धक्का

सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. उत्तम जानकर यांच्या मुलालाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र माळशिरसमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवत पक्षाची प्रतिष्ठा राखली.

Sharad Pawar : शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याच्या..

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांचे अपडेट येत असून शरद पवार यांच्या तब्येत बिघडल्याची माहिती पुढे येत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील गटाचा निर्विवाद विजय 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. राजकीय प्रतिष्ठेच्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक गटांमध्ये घवघवीत यश मिळवत विरोधकांची अपेक्षा फोल ठरवली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पुतणे विवेक वळसे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक गटांत घवघवीत यश मिळवले. विरोधकांची अपेक्षा फोल ठरली.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : महायुतीसमोर महाविकास आघाडी निष्प्रभ – बावनकुळे

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील दणदणीत विजयानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीसमोर महाविकास आघाडी पूर्णतः निष्प्रभ ठरल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात यापुढेही महायुतीच सत्तेत राहील, असा ठाम विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ता स्थापन केली आहे. एकूण ७३ पैकी ५५ जागांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादीने ४० जागांवर विजय मिळवत ३७ चा बहुमताचा आकडा सहज पार केला. भाजपला ७, शिवसेनेला ४, ठाकरे गटाला ३ तर शरद पवार गटाला १ जागा मिळाली आहे.

STBus : लालपरी ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस

शिवनेरी आणि शिवशाही बससेवेनंतर आता एसटीच्या लालपरी ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ बसचा समावेश होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील प्रवाशांना नव्या, आधुनिक आणि सुरक्षित बससेवेचा लाभ मिळणार आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  रयत क्रांती पक्षाच्या मोहिनीताई सागर खोत बागणी जिल्हा परिषद मधून विजय

रयत क्रांती पक्षाच्या उमेदवार मोहिनीताई सागर खोत यांनी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. त्या आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई असून या विजयामुळे परिसरात रयत क्रांती पक्षाचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आहे.

NagpurToMumbai : नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास आणखी वेगवान

नागपूरहून थेट दक्षिण मुंबईकडे जाणारा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. ठाण्यात मुंबई–वडोदरा महामार्ग ते ठाणे सागरी किनारा मार्गाला जोडणारा १८ किलोमीटरचा नवीन रस्ता उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने या ८ पदरी रस्त्याच्या बांधकामाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :    जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालात महायुतीची सरशी

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निकालात महायुतीने दणदणीत वर्चस्व मिळवले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाविकास आघाडी निष्प्रभ ठरली. या विजयानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात यापुढेही महायुतीच दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  कोल्हापूर जिल्हा परिषद मतमोजणी अंतिम टप्प्यात; महायुती मॅजिक फिगर गाठण्याच्या वाटेवर

कोल्हापूर जिल्हा परिषद मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. महायुती मॅजिक फिगर गाठण्याच्या वाटेवर असून कोल्हापूर जिल्हापरिषदेवर महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आत्तापर्यंतच्या निकालात महायुतीचा डंका पाहायला मिळत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार करुणा शिवशरण विजयी

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार करुणा शिवशरण विजयी झाल्या असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे साळुंखे पराभूत झाल्या आहेत

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या 10 अशा एकूण 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ जिल्हा परिषद गटातून प्रवीण तानवडे विजयी तर भाजपच्या जयश्री शेळके यांचा पराभव झाला आहे

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : सांगलीत जयंत पाटलांचा दबदबा कायम, 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी SP विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा करिष्मा

कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा करिष्मा पाहायला मिळत असून कडेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : लातूर जिल्हा परिषद मध्ये भाजपने 14 जागांवर विजय मिळवला

लातूर जिल्हा परिषदमध्ये भाजपने 14 जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस 11 जागांवर विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 5 जागांवर विजय मिळवला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील विक्रम मतांनी विजयी

माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील विक्रम मतांनी विजयी झाले असून पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज आणि बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र आमिर अब्दुल सत्तार अंभई जिल्हा परिषद गटातून विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला असून उचगाव मतदार संघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला असून महिलांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल पवार विजयी

सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल पवार विजयी झाले असून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पराभूत झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटलांना धक्का

मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटलांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचे भाऊ संतोष पाटील यांचा पराभव झाला असून भाजपचे लखन माने नरखेड जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  कोल्हापूर वडणगे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा विजय

कोल्हापूर वडणगे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद इंद्रजीत पाटील, तर पंचायत समिती बळीराम कळके यांचा विजय झाला असून चिखली गावामध्ये कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या 10 सर्व 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  शिवसेना नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का

शिवसेना नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का बसला असून कागल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ 1 पंचायत समितीची जागा आली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  सिल्लोड तालुक्यात भाजपने पहिलं खातं उघडलं

सिल्लोड तालुक्यात भाजपने पहिलं खातं उघडलं असून उंडणगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे डॉ सचिन वाघ विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  सांगली जिल्हा परिषद उद्धव ठाकरे गटाने उघडले खाते

सांगली जिल्हा परिषद उद्धव ठाकरे गटाने खाते उघडले असून वाळवा तालुक्यात उद्धव ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील चिकुर्डे जिल्हा परिषद गटातून विजयी झाले

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज जिल्हा परिषद गटात भाजपाच्या चैत्राली मुळे यांचा विजय

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज जिल्हा परिषद गटात भाजपाच्या चैत्राली मुळे यांचा विजय झाला असून भाजपाच्या चैत्राली मुळे यांनी 2200 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  कोल्हापूर राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसचे सागर धुंदरे विजय

कुडाळ पंचायत समिती गण भाजपाचे सौरभ बाबा शिंदे विजयी

कुडाळ पंचायत समिती गण भाजपाचे सौरभ बाबा शिंदे 2100 मतांनी विजयी झाले आहेत

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद गटातून भाजपच्या माधुरी मुन्नाराजे मोरे विजयी

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद गटातून भाजपच्या माधुरी मुन्नाराजे मोरे विजयी झाल्या असून उपळाई पंचायत समिती गणात भाजपचे प्रा. नितीन झाडबुके विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सांगली कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी

सांगली कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के विजयी झाले आहेत. तर कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या नागज गणातून वामन कदम आणि ढालगाव गणातून रविकिरण घागरे विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : माळशिरस पंचायत समिती गण भाजपचे ज्ञानोबा आप्पा यादव विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : छत्रपती संभाजीनगर उंडणगाव गणातील भाजप सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश बनकर यांचा विजय

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सातारा मंत्री मकरंद पाटील यांना धक्का

सातारा मंत्री मकरंद पाटील यांना धक्का बसला असून महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पुणे जिल्ह्यात प्राथमिक कलात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

पुणे जिल्ह्यात प्राथमिक कलात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 46 उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडीवर असून 24 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : तानाजी सावंत याचं पुतणे पृथ्वीराज सावंत 7000 मतांनी विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सोलापूर मोहोळ तालुक्यातील खंडाळी गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार गणेश मुळे विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गणातून भाजपचे विनोद मोरे विजयी

सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गणातून भाजपचे विनोद मोरे विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : कोल्हापूरात काँग्रेसचा आतापर्यंत 12 जागांवर विजय

कोल्हापूरात काँग्रेसने आतापर्यंत 12 जागांवर विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवल्या आहेत. भाजप 7, शिवसेना 6, जनसुराज्यने 4 जागा मिळवल्या असून ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा मिळवली आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पनवेल मध्ये आतापर्यंत भाजपचे सहा उमेदवार विजयी

पनवेल मध्ये आतापर्यंत भाजपचे सहा उमेदवार विजयी झाले असून नेरे जिल्हापरिषदेवर भाजपचे उमेदवार विजयी तर आदइ पंचायत समितीवर देखील भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते

सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसने खाते उघडले असून पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजयी झाले आहेत. ऋषिकेश लाड काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : महाडमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 ही जागांवरती शिंदे सेना आघाडीवर

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गट जिल्हा परिषद उमेदवार नासेर सय्यद हुसेन विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे जिल्हा परिषद गटातून बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी

पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे जिल्हा परिषद गटातून बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीचे दोन्ही पंचायत समिती सदस्य देखील विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE  कोल्हापूर भादोले जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पाटणला शिवसेनेचा पहिला विजय

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : रायगडच्या नागोठणा पंचायत समिती गणनातून राष्ट्रवादीच्या समृद्धी कोळी विजयी

रायगडच्या नागोठणा पंचायत समिती गणनातून राष्ट्रवादीच्या समृद्धी कोळी 4141 मतांनी विजय झाल्या आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातून भाजपाचे नेताजी खंडागळे विजय

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : मोहोळ तालुक्यातील आष्टी गटातून राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे विजयराज डोंगरे विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत पाचही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर तर भाजप पिछाडीवर

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी

माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते अकराशे मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जाणकार यांचा पराभव केला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सोलापूर अक्कलकोटतील चपळगाव पंचायत समिती गणातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : रायगडमधील शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आघाडीवर

मतमोजणीला सुरूवात झाली असून रायगडमधील शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आघाडीवर आहे. बिरवाडी गटातून विकास गोगावले आघाडीवर आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या उमेदवार संस्कृती राम सातपुते आघाडीवर

माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या उमेदवार संस्कृती राम सातपुते आघाडीवर असून संस्कृती सातपुते या माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जीवन जानकर पिछाडीवर असून आमदार उत्तम जानकर यांचे ते पुत्र आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : सांगली जिल्ह्यात काँग्रेसने खाते उघडले

सांगली जिल्ह्यात काँग्रेसने खाते उघडले असून पलूस पंचायत समितीच्या कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा सुहास पवार 1831 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून बापूसाहेब पठारे यांची मुलगी रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : लातूर आर्वी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी

आर्वी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी झाल्या असून आर्वी पंचायत समिती गणात काँग्रेसच्या तनुजा चव्हाण तर, महापूर गणातून काँग्रेसचे श्रीकांत बैले विजयी झाल्या आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE : बारामती तालुक्यातील सुपे गणातून भाजपच्या उज्वला पोपट खैरे विजयी

बारामती तालुक्यातील सुपे गणातून भाजपच्या उज्वला पोपट खैरे 2700 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीने या गणात भाजपसाठी जागा सोडली होती

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सांगली मिरज तालुक्यातील भोसे जिल्हापरिषद गटातून आशिष जाधव भाजप आघाडीवर

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  छत्रपती  संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटातून आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण आघाडीवर

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  अक्कलकोट चपळगाव गटातून भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी आघाडीवर

अक्कलकोट चपळगाव गटातून भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी 2500 मतांनी आघाडीवर आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खाते खोललं; भाजपला मोठा धक्का

सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खाते खोललं असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सांगली जिल्हा परिषद खरसुंडी गटातून जयदीप भोसले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी

सांगली जिल्हा परिषद खरसुंडी गटातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जयदीप भोसले विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  मंगळवेढा तालुक्यातील दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून भाजपचे रमेश भांजे विजयी

मंगळवेढा तालुक्यातील दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून भाजपचे रमेश भांजे विजयी झाले असून पंचायत समिती गणातून एक भाजपचा तर एक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटातील शिंदेसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 2 सदस्य विजयी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटातील शिंदेसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 2 सदस्य विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  रायगड जिल्हापरिषद वावंजे येथील भाजपच्या उमेदवार विजयी

रायगड जिल्हापरिषद वावंजे येथील भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या असून भाजपच्या कमला देशेकर विजयी झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सांगोला तालुक्यातून महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सांगोला तालुक्यातून महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  मोहोळ मधील राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे विजयी

मोहोळ मधील राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे विजयी झाले आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सांगली - तासगाव तालुक्यातल्या पेड पंचायत गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमोद शेंडगे आघाडीवर

सांगली तासगाव तालुक्यातल्या पेड पंचायत गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमोद शेंडगे आघाडीवर आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  सिल्लोडच्या अंभई गटातून अब्दुल सत्तार यांचे पुत्र आमेर अब्दुल सत्तार आघाडीवर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सिल्लोडच्या अंभई गटातून अब्दुल सत्तार यांचे पुत्र आमेर अब्दुल सत्तार आघाडीवर आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  रायगडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात

रायगडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून रायगडमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results LIVE :  माढ्यात राष्ट्रवादीने खाते उघडलं

माढ्यात राष्ट्रवादीने खाते उघडलं असून माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात अजित पवाराच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी दळवे विजयी झाल्या आहेत.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :   पंढरपूर तालुक्यातील करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख आघाडीवर

पंढरपूर तालुक्यातील करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब देशमुख पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE :  मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टपाली मतमोजणीत अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर 

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टपाली मतमोजणीला सुरूवात झाली असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : परभणीमधील एका जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडीवर 

Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026 LIVE : टपाली मतमोजणीला सुरुवात

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथ शिंदेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही.

Sindhudurg : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल; मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल असून मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Sangli: आज सांगलीत ZP निवडणुकीसाठी मतमोजणी

आज सांगलीत ZP निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडणार असून मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Pune : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल असून पुण्यात निवडणूक निकालानंतर जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी 25 हजार मतदान केंद्रावर निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. आज जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com