Nilesh Lanke : निलेश लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

Nilesh Lanke : निलेश लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. आमदार निलेश लंके आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार आहेत.

शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंके लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दाखल होणार असल्याची चर्चा होती. आज चार वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद असणार आहे.पत्रकार परिषदेत निलेश लंके अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com