Nitesh Rane : निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

Nitesh Rane : निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited by:
Varsha Bhasmare
Published on

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आज तीव्र प्रतिक्रिया देत आपल्या भावाला मुद्दाम लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय,” असा थेट दावा नितेश राणेंनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले,“काही लोकांना निलेश राणे राजकारणात सक्रिय नको आहेत. त्यामुळे त्यांना एकटं पाडण्याचा आणि बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व राजकीय खटाटोपाचे खेळ आहेत. पुढे “२ तारखेपर्यंत आम्ही संयम पाळणार आहोत. आम्ही शांत बसून परिस्थिती पाहत आहोत. पण हा संयम कायमचा नाही. ”२ तारखेनंतर काय होणार ते सगळे पाहतील. आम्ही अन्याय सहन करणार नाही. निलेश राणेंवर अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही.

नितेश राणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे सिंधुदुर्ग–रत्नागिरी बेल्टमध्ये राजकारण अधिकच तापत आहे. विरोधकांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून पुढील काही दिवसांत या विषयाची दिशा कोणत्या टप्प्यावर जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com