Nirmala GavitNirmala Gavit
ताज्या बातम्या
Nirmala Gavit : निर्माला गावित यांच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती; पोलिसांनी केला मोठा खुलासा
शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या नाशिकमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी या अपघाताबद्दल मोठा खुलासा केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना नाशिकमध्ये वॉक करत असताना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या नाशिकमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी या अपघाताबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अपघातामागे कोणताही कट नाही. कारचालक रामनाथ चौहानने अनावधानाने एक्सलेटर दाबल्यामुळे हा अपघात झाला. कारच्या ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने कार चालवताना त्याचा ताबा गेला आणि निर्मला गावित यांना धडक लागली.
पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी रामनाथ चौहानला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपीने अपघातानंतर कार सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. निर्मला गावित यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

