बातम्या
आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? भावी मुख्यमंत्री’च्या बॅनरवरून नितेश राणेंचा सवाल
अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागत आहेत.
अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागत आहेत. अशातच आता आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर लागले आहे. त्यामुळे आता चर्चा सुरु झाल्या आहेत. नागपूरमधील हे पोस्टर्स चर्चेचा विषय बनले आहे. नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर या बॅनरवरुन आता नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले की, शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत असे म्हणत नितेश राणे यांनी टीका केली आहे.