राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’त हिंदूंना स्थान नाही - नितेश राणे

राहुल गांधींच्या ‘मोहब्बतच्या दुकाना’त हिंदूंना स्थान नाही - नितेश राणे

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेतून संवाद साधला तेव्हा खलिस्तानी झेंडे फडकावत खलिस्तानच्या मागणीबाबत घोषणाबाजी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदु मंदिरांसमोर हिरवे झेंडे फडकवून डिजे लावला जातो. काँग्रेसने एक मोहब्बतचे दुकान कर्नाटकमध्ये उघडले आहे.. हिंदूंचा अपमान करणे म्हणजे राहुल गांधींचे मोहब्बतचे दुकान उघडणे आहे.

तसेच कर्नाटकमध्ये हिंदुंची काय अवस्था झाली आहे हे जाऊन बघितले पाहिजे. राहुल गांधी बोलतात ‘में मोहब्बत की दुकान यहा खोलने आया हू.राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना स्थान नाही. असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com