मी WHO ला पत्र लिहिणार आणि संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करायला सांगणार - नितेश राणे

मी WHO ला पत्र लिहिणार आणि संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करायला सांगणार - नितेश राणे

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. नुकतेत आता नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, भारताच्या बाहेर जाऊन हिंदू धर्माची, देशाची बदनामी करतात. त्याला संजय राऊत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर म्हणणार का?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापेक्षा तुझ्या जिभेचं काहीतरी कर. तुझी जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे. असे नितेश राणे म्हणाले.

यासोबतच नितेश राणे म्हणाले की, एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते. WHO ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यांनी संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं, अशी त्यांना विनंती करणार आहे. असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com