सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी ‘ही’ व्यक्ती उपस्थित, नितेश राणे व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी ‘ही’ व्यक्ती उपस्थित, नितेश राणे व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

सुशांतसिंह राजपूतवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.
Published on

सुशांतसिंह राजपूतवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. यातच सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थिती रुपकुमार शाह यांनी केलाय. कारण मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या, असेही शाह यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात कर्तव्यास होते. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता बेबी पेंग्विन दूर नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांच्या वतीने करण्यात येतोय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com