Nitin Gadkari Health Update
Nitin Gadkari Health UpdateTeam Lokshahi

Nitin Gadkari Falls Sick : पश्चिम बंगालमधील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची तब्येत बिघडली

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत एका कार्यक्रमादरम्यान अचानक बिघडली. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची तब्येत आचानक बिघडली आहे. नितीन गडकरी सिलिगुडीतील एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला पोहोचले होते आणि कार्यक्रमाच्या स्टेजजवळील एका खोलीत चहा पीत होते, तेव्हा अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना भोवळ आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील त्यांना अनेकवेळा स्टेजवर भोवळ आली आहे.

यानंतर जवळच्या रुग्णालयाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरात शुगरची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com