Bihar CM
Bihar CMBihar CM

Bihar CM : बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी; गांधी मैदानात शपथविधी सोहळा

बिहारच्या नवीन सरकारची तयारी दिल्लीमध्ये सुरू असून, शपथविधी सोहळा २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील गांधी मैदानावर होणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बिहारच्या नवीन सरकारची तयारी दिल्लीमध्ये सुरू असून, शपथविधी सोहळा २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील गांधी मैदानावर होणार आहे. नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री आणि २० मंत्री असतील.

राजकीय घडामोडींची गती वाढली असून, भाजप आणि जेडीयूने मंत्रिमंडळाच्या सदस्यांची नावे जवळपास ठरवली आहेत. भाजप आणि जेडीयू पक्षांची स्वतंत्र बैठक होईल, त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होईल.

शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपने एनडीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजप, जेडीयू, एलजेपी (आर), हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) चे आमदार यांच्यासह शपथ घेतील.

थोडक्यात

  • बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी ….

  • पाटण्यातील गांधी मैदानात शपथविधी सोहळा होणार...

  • नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार....

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com