नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून आता पीएम म्युझियम म्हणून ओळखलं जाणार

नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून आता पीएम म्युझियम म्हणून ओळखलं जाणार

नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलून आता प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी असं ठेवण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलून आता प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी असं ठेवण्यात आले आहे. जून 2023 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत नेहरु मेमोरियल म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेहरु मेमोरियल म्यूजियमच्या नाव बदलाला काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नाव बदलाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली.

नामांतराची प्रक्रिया जूनमध्ये सुरु झाली आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे काम पूर्ण झालं हा निव्वळ योगायोग आहे. असं पीएम संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com