कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही - अजित पवार

कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही - अजित पवार

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथे सरपंचांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला

संजय देसाई, सांगली

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथे सरपंचांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी विरोधी नेते अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, तासगाव करानो आबांना कधी तुम्ही चांगल्या मतांनी निवडून दिला आहे का? का रे बाबांनो मात्र हाच आबा संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाने आकर्षित केलं होतं. पण कधी तुम्ही आबांना भरपूर मताधिक्याने निवडून दिला नाही. मी तर बारामती मधून लाखोच्या मताने निवडून येतो. आणि पार्सल आल्याला परत पाठवतो. अशी टीका ही गोपीचंद पडळकर याचे नाव न घेता केली.

पण आज काही लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांना आत टाकले पण त्याच्या आयुष्यातील काही संजय राऊत यांना आत मध्ये टाकले. आणि नंतर म्हणाले यांच्या बद्दल पुरावेच नाहीत. मी चुकून नाव चुकले की लगेच माफी मागा. पण छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच. कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही. स्वराज्य रक्षक म्हणजे राज्याचे रक्षक आणि धर्माचे पण रक्षक. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com