महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार
Admin

महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार

महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सागरी सेतूवरील वाहतूक सुरु करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. मुंबईकरांना रेसकोर्स उरण किंवा खारघर सिडकोच्या जागेत झाल्यास सहज ये जा करणे शक्य होऊ शकते, असा विचार केला जात आहे.

याआधी मुलुंड डम्पिंग ग्राऊंड परिसरातील जागेचा विचार करण्यात आला होता. मुलुंडच्या जागेवर जर रेसकोर्स साकारायचं असेल तर त्यासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासची खाजगी मालकीची जागा विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. त्यामुळे आता मुंबई बाहेरील उरण आणि खारघरमधील सिडकोच्या जागेचा विचार करण्यात येत असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेला महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवर थीम पार्क उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जागा पूर्ण आपल्या मालकीची व्हावी, यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे ( मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) काम अंतिम टप्प्यात आहे.मुंबईकरांना रेसकोर्स उरण किंवा खारघर सिडकोच्या जागेत झाल्यास सहज ये जा करणे शक्य होऊ शकते, असा विचार केला जात आहे. मात्र अजून निर्णय झालेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com