Pune Metro : आता पीएमपी बसच्या तिकिटातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार

Pune Metro : आता पीएमपी बसच्या तिकिटातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार

पुण्यात मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचे १ ऑगस्टला उदघाटन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यात मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचे १ ऑगस्टला उदघाटन झाल्यावर जवळपास पीएमपी बसच्या तिकिटातच प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. वनाज ते रूबी हॉल मार्गांसाठी २५ रुपये तर, पिंपरी चिंचवड- शिवाजीनगर न्यायालय दरम्यानसाठी ३० रुपये तिकिट असेल. मेट्रोसाठी किमान तिकिट १० रुपये असेल.

शहरातून आता गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यान तर पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान आता थेट मेट्रो सेवेला सुरवात होईल. या पूर्वी वनाज ते गरवारे मार्गावर वाहतूक सुरू झाली होती. तिचा विस्तार आता रुबी हॉल क्लिनिकपर्यंत होत आहे.

त्यामुळे गरवारे कॉलेज ते रुबी हॉल दरम्यानच्या मार्गासाठी आता २० रुपये तिकिट असेल. तर, पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर सध्या मेट्रो वाहतूक सुरू आहे. आता तिचा विस्तार फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान होणार असून त्या प्रवासासाठी २५ रुपये तिकिट असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com