आता ब्लूक टिक ट्विटर अकाऊंटची पडताळणी होणार; एलॉन मस्क यांच ट्विट पाहा

आता ब्लूक टिक ट्विटर अकाऊंटची पडताळणी होणार; एलॉन मस्क यांच ट्विट पाहा

टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत.

टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजून एक माहिती समोर येत आहे. ट्विटरवरील ब्लूक टिक अकाऊंटची पडताळणी होणार असून अपात्र ठरणाऱ्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. याची माहिती एलॉन मस्क यांनी ट्विट करुन दिली आहे.

एलॉन मस्क ट्विटमध्ये म्हणाले की, ट्विटरच्या आधीच्या ब्लू टिक प्रक्रियेमध्ये अने क्षुटी आढळल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ब्लू टिकची पडताळणी होणार असून पात्र नसणाऱ्यांची ब्लू टिक हटवण्यात येईल.'असे त्याने ट्विट करुन सांगितले आहे. पॅरोडी अकाऊंट्स हे लोकांना फसवण्याचं काम करत आहेत. सध्या ट्विटकडून बनावट अकाऊंट्सवर कारवाई सुरु आहे. अनेक बनावट अकाऊंट्स हटवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com