UPI New Rules
UPI New Rules

UPI New Rules : यूपीआयद्वारे आता गोल्ड लोन, पर्सनल लोन आणि बिझनेस लोनची रक्कम ट्रान्सफर करता येणार

UPI ग्राहकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

( UPI New Rules) UPI ग्राहकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता UPI युजर्सना प्रॉपर्टी लोन किंवा गोल्ड किंवा एफडीचे पैसे UPI द्वारे काढता येणे शक्य होणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI च्या नियमावलीमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे आता युपीआय सिस्टम अधिक सोपी आणि युजर फ्रेंडली होणार आहे. आता युपीआय यूजर्सना गोल्ड लोन, बिजनेस लोन किंवा एफडीची रक्कम युपीआय द्वारे हॅन्डल करता येणार आहे. युपीआयला लोन अकाऊंट लिंक करता येणार असल्यामुळे ही सुविधा युपीआय धारकांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे हा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून सर्वत्र लागू केला जाणार आहे. यूपीआय अ‍ॅप Paytm, Phonepe, Google Pay च्या माध्यमातून क्रेडिट कार्डपासून बिजनेस लोनपर्यंत सर्व पैशांचे व्यवहार हॅन्डल करू शकणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लोनचे व्यवहार ऑनलाइन करणे शक्य होणार आहे. UPI च्या माध्यमातून आता गोल्ड लोन, पर्सनल लोन आणि इतर कर्जाचे पैसे काढणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या UPI ॲपमध्ये कर्ज खात्याची नोंदणी करावी लागणार आहे. त्याद्वारे तुम्ही UPI च्या माध्यमातून पेमेंट करणे सहज शक्य होणार आहे.यूपीआयच्या नवीन नियमानुसार यूजर पी2पी सोबत पी2पीएम व्यवहार करु शकणार आहे एनपीसीआयने यासंदर्भात काही नियम आणि कायदे तयार केले असून सध्या युपीआय युजर एका दिवसात केवळ 1लाखांपर्यंतचे पेमेंट करू शकणार आहे.

तसेच दिवसभरात युपीआयव्दारे केवळ 10 हजारांपर्यंत पैसे काढू शकणार आहे. याचा सर्वाधिक फायदा छोट्या उद्योजकांना आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्यांना त्यांचे कर्जाचे आणि लोनसंबंधी व्यवहार या नवीन नियमावली द्वारे करता येणे सहज शक्य होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com