Kunbi Certificate : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र वाटप

Kunbi Certificate : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र वाटप

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखल देण्याचे काम सुरू झाले. मराठा समाजातील अर्जदाराला कुणबी जात प्रमाणपत्र मराठावाड्यातील आठ जिल्ह्यात यानंतरवाटपाचं काम सुरू झालं आहे. इतक्या लोकांना त्याचा फायदा झाला.

९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे वाटप

२ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत – औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी – मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी (OBC) जात प्रमाणपत्रांचे वाटप आता जलदगतीने सुरू आहे. हजारो मराठा कुटुंबांना या प्रमाणपत्रांचा थेट लाभ मिळू लागल्याने स्थानिक स्तरावर आनंदाचे वातावरण आहे. शैक्षणिक प्रवेश, नोकरीतील आरक्षण आणि इतर शासकीय योजनांमध्ये मोठा फायदा मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. सरकारी यंत्रणा विशेष शिबिरे, तपासणी पथके आणि दस्तऐवज पडताळणीच्या आधारे प्रकरणे चोख तपासत असून, पुढील काही दिवसांत प्रमाणपत्रांच्या वाटपात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १४ अर्ज आली आहेत, त्यात एकालाही प्रमाणपत्र मिळाले नाही.

जालना जिल्ह्यातून ७८ अर्ज आले, ८ जणांना प्रमाणपत्र मिळाली.

बीड जिल्ह्यात २२ अर्ज आले होते, त्या २२ जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

लातूर १२ अर्ज, ९ जणांना प्रमाणपत्र मिळाली.

धाराशिव जिल्ह्यात १३ अर्जापैकी ४ जणांना प्रमाणपत्र मिळाली.

परभणी जिल्ह्यात ४४५ अर्ज, ४७ प्रमाणपत्र मिळाली.

हिंगोली ५ अर्ज, ३ प्रमाणपत्रे मिळाली.

नांदेड जिल्ह्यातील ५ अर्जा पैकी ५ जणांना प्रमाणपत्रे मिळाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com