OBC : ओबीसी नेत्यांची नागपुरात बैठक; जीआरविरोधात पुढील रणनीतीवर चर्चा
थोडक्यात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
मोहोळ यांच्यावर संबंधित जमिनीच्या व्यवहारात कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनीदेखील मोहोळ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Vijay Namdevrao Wadettiwar ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मोहोळ यांच्यावर संबंधित जमिनीच्या व्यवहारात कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनीदेखील मोहोळ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
वडेट्टीवार यांनी रविवारी (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले की, “मुरलीधर मोहोळ यांच्या गैरकारभाराचे धागेदोरे आता समोर येत आहेत. महाराष्ट्रभर जमिनींचे व्यवहार संशयास्पद पद्धतीने होत आहेत आणि यात अनेक मोठी नावे गुंतलेली आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना अशा प्रकरणात सहभागी असणे अनुचित आहे, त्यामुळे मोहोळ यांनी त्वरित राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ओबीसी समाजाने आंदोलन केल्यानंतरही सरकार हललेले नाही. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींचे नुकसान होत आहे. सरकारमधील काही नेते हे वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.” वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, “1 नोव्हेंबरला नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन जीआरविरोधात पुढील भूमिका निश्चित केली जाईल.”

