Raj Thakarey : "कोणी काय खावं, कोणी काय नाही हे सरकार किंवा महापालिका ठरवणार नाही...."
Raj Thakarey : "कोणी काय खावं, कोणी काय नाही हे सरकार किंवा महापालिका ठरवणार नाही...." राज ठाकरेंची जोरदार टीका Raj Thakarey : "कोणी काय खावं, कोणी काय नाही हे सरकार किंवा महापालिका ठरवणार नाही...." राज ठाकरेंची जोरदार टीका

Raj Thakarey : "कोणी काय खावं, कोणी काय नाही हे सरकार किंवा महापालिका ठरवणार नाही...." राज ठाकरेंची जोरदार टीका

राज ठाकरे: स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर तीव्र प्रतिक्रिया, लोकांचे स्वातंत्र्य कमी करण्याचा आरोप.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Raj Thackeray on Kalyan-Dombivli BMC has decided Chicken Mutton Shops Closed on Independence day : 15 ऑगस्टच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कत्तलखाने बंद ठेवण्यासोबतच मटण व मांस विक्रीसही तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना यासंबंधी विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांचे स्वातंत्र्य कमी केले जात आहे. या संदर्भात राजकीय विविध प्रतिक्रिया समोर येत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये महत्त्वाचा मुद्दा या विषयाला अनुसरून मांडला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

आज मुंबईमधील एका कार्यक्रमांतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले मांडले. ते म्हणाले, “आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत.” एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही?, स्वातंत्र्यदिना दिवशी तुम्ही कोणतीतरी बंदी आणताय हाच खूप मोठा विरोधाभास आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन असे दोन दिन आपण साजरे करतो प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्य आणि अशा दिवशीच मी बंदी कशी काय आणताय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. कोणाचे काय सण आहेत आणि कोणाचा कोणता धर्म आहे याप्रमाणे त्यांनी काय खावं काय नाही यावर सरकारने लक्ष घालू नये असेही ते म्हणाले. 1988 साली या संदर्भात आणलेल्या कायद्याचा सरकारने विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारची कोणतीही स्वातंत्र्यावर गदा नागरिकांच्या आणली नाही पाहिजे असे ते म्हणाले आहेत.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घालण्यात आलेल्या या बंदीला थेट विरोध दर्शवला. त्यांनी हे निर्णय लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचे सांगितले. सरकार आणि महानगरपालिकेने नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करू नये अशी भूमिका त्यांनी मांडली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com