Virat Morcha: राज्यातील विरोधकांचा एकत्रित मोर्चा: मुंबईत 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन केले होते. या सभेच्यावेळी राज ठाकरेंनी दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत असे अनेक लोक उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी पाहिले भाषण केले.
त्यावेळी ते म्हणाले की, "खरं तर इथे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात पण आज आम्ही सर्व पक्षीय त्यांच्यावतीने आलो आहोत. आज संपुर्ण मनसेचे कॅबिनेट इथे आहे, त्याबरोबरच जयंत पाटील, प्रकाश रेड्डी, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई राजू पाटील अनेक विरोधी पक्ष नेते उपस्थितीत आहेत. बाळा नांदगावकर हे 24 वर्षानंतर शिवसेना भवनात उपस्थितीत राहिले आहेत. जयंत पाटील सुद्धा पहिल्यांदाच भवनात आले आले आहेत. ही पत्रकार परिषद घाईत घेण्याचे विशेष कारण असल्याने बोलवण्यात आली आहे."
दिल्लीत राहूल गांधी तर महाराष्ट्रात आम्ही सर्व लढत आहोत- राऊत
"निवडणूक कामाविरुद्ध आम्ही लढत आहोत. दिल्लीत राहूल गांधी तर महाराष्ट्रात आम्ही सर्व लढत आहोत. या लढाईतून काय निष्पन्न होईल ते माहिती नाही, पण आम्ही लढणरा आहोत. आगामी निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाली आहे. 1 कोटी मतदारांची घुसखोरी आहेत. आमचे अमित शाह यांना आव्हान देत आहोत की, महाराष्ट्राच्या 1 कोटी घुसखोर झालेल्या मतदार यांना काढा आणि यातून या मोहिमेला सुरुवात करा. राज ठाकरे यांनी सभेत लावलेल्या व्हिडिओमध्ये बुलढाण्यातील आमदार सतीश गायकवाड म्हणाले की, 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार आहेत. हे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य केलं आहे. राऊतांचा निवडणूक आयोगानं हल्लाबोल केला."
मुंबईत सर्व विरोधीपक्षीय नेत्यांचा विराट मोर्चा
येत्या 1 नोव्हेंबरला राज्यातील सर्वपक्षीय विरोधकांचा मुंबईत विराट मोर्चा निघेल. या मोर्चाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार, तर ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असे अनेक कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहे. असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच प्रमुख नेत्यांसोबत आणखी एक पत्रकार परिषद होईल, अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे.