Father's Day 2025 : फादर्स डे 2025 निमित्त वडिलांच्या मानसिक आरोग्यासाठी काही सोप्या टीप्स

Father's Day 2025 : फादर्स डे 2025 निमित्त वडिलांच्या मानसिक आरोग्यासाठी काही सोप्या टीप्स

फादर्स डे 2025 निमित्त जाणून घ्या काही उपयुक्त उपाय जे वडिलांना तणावमुक्त ठेवायला मदत करतील.
Published by :
Prachi Nate
Published on

फादर्स डे म्हणजे केवळ गिफ्ट देण्याचा दिवस नाही, तर वडिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा विचार करण्याची खरा दिवस आहे. ऑफिसमधील प्रेशर, घरातील जबाबदाऱ्या आणि समाजाची अपेक्षा या सर्व गोष्टी वडिलांच्या मनावर मोठा भार टाकतात. त्यांचं मानसिक आरोग्य जपणं ही आता काळाची गरज बनली आहे. चला तर मग जाणून घेऊया काही उपयुक्त उपाय जे त्यांना तणावमुक्त ठेवायला मदत करतील.

वडील अनेकदा घरासाठी मजबूत खंबीर आधार ठरतात, पण त्यांना भेडसावणाऱ्या तणावांबाबत बोलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या भावना पत्नी, मित्र किंवा मुलांशी शेअर करणं हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

दररोज तीन वेळा चार सेकंद श्वास घेणे, चार सेकंद थांबवणे आणि चार सेकंद श्वास सोडणे हे तंत्र वापरल्यास मन शांत राहते. हार्वर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञही या पद्धतीची शिफारस करतात.

वेळेचं नियोजन आणि स्वतःसाठी काही क्षण - दिवसाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणं कठीण वाटतं, पण आवश्यक आहे. 'नो फोन टाइम', 'मी टाइम', किंवा थोडा विश्रांतीचा वेळ ठरवून ठेवणे मनाला समाधान देते.

चालणे आणि व्यायामाला प्राधान्य -नियमित चालणे किंवा हलकाफुलका व्यायाम केल्यास स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. दररोज फक्त 30 मिनिटांची शारीरिक हालचालही मानसिक दृष्टिकोन सुधारते.

सततच्या मोबाइल, ई-मेल्स आणि नोटिफिकेशनमुळे मानसिक थकवा वाढतो. आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहणं ‘डिजिटल फास्टिंग’सारखं काम करतं आणि मनाला शांती मिळते.

तणाव खूप वाढल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घेणे उपयुक्त ठरते. ही कमकुवतपणाची नाही तर जबाबदारीची पावती असते.

वडील-मुलांमध्ये संबंध दृढ करायचे असतील, तर एकत्र जेवण, चित्रपट, फिरायला जाणे किंवा साधा खेळ – या गोष्टी मनाला स्फूर्ती देतात.

वडिलांवर जबाबदाऱ्या असतात, पण त्यांच्यामध्ये भावनिक गरजाही असतात. त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन हे फक्त वैयक्तिकच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com