Death during Marathon is SataraTeam Lokshahi
ताज्या बातम्या
सातारा ब्रेकिंग: हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत धावताना एकाचा मृत्यू
मॅरेथॉन मध्ये धावताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
प्रशांत जगताप | सातारा: साताऱ्यात आज हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सात हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या राज पटेल या 32 वर्षीय स्पर्धकांचा धावताना मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाचा साताऱ्यात आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये धावताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या स्पर्धकाला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात आयोजक आणि पोलीस देखील दाखल झाले असून मृत झालेल्या स्पर्धकांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.. याच बरोबर इतर 3 स्पर्धक जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने धावपटू प्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.