Chhattisgarh
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Chhattisgarh )छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. चकमकीच्या ठिकाणी शोध घेत असताना जवानांना एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि त्याच्यासोबत शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला असल्याची माहिती मिळत आहे.

सुकमा-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये गोळीबार झाला. चकमकीदरम्यान झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून त्यांना डिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

सुकमा-दंतेवाडा सीमेवरील जंगलामध्ये विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफने नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली होती.परिसरामध्ये माओवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com