धनगर समाजाला त्यांचे आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील : चंद्रकांत पाटील

धनगर समाजाला त्यांचे आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील : चंद्रकांत पाटील

धनगर समाजाला त्यांचे आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील असा दावा भाजपानेते आणि कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

धनगर समाजाला त्यांचे आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील असा दावा भाजपानेते आणि कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केला. वानलेसवाडी येथील संत बाळुमामा मंदिराच्या कंपाउंड वाल कामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

धनगर समाजाला आरक्षण अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी ज्यावेळी झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टीसच्या अहवालानुसार धनगर समाजाला आदिवासी समाजाला देण्यात येणाऱ्या योजना देण्यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करून 22 योजना आखल्या होत्या मात्र आमचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीकडून या योजना कागदावरच राहिल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

मात्र आता आमचे सरकार आले आहे त्यामुळे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की मार्गी लागेल आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण देतील असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केला

धनगर समाजाला त्यांचे आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील : चंद्रकांत पाटील
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com