बातम्या
माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” - सुषमा अंधारे
शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे.
शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. सतत शिंदे गट - ठाकरे गट एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात होतं. या नाराजीनंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली होती. सुषमा अंधारेंनी केलेल्या काही विधानांमुळे वारकरी संप्रदाय आक्रमक झाला होता.