Bihar Weather : सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; बिहारमधील 'हे' जिल्हे हाय अलर्टवर

Bihar Weather : सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; बिहारमधील 'हे' जिल्हे हाय अलर्टवर

बिहारचे हवामान बदलले आहे. पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याने बिहारमधील 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

बिहारमध्ये गोल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा असे वातावरण बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तापमानही आता सौम्य झाले असून कडक उन्हापासून काही प्रमाणात आराम मिळाला आहे. बिहारमध्ये वीज कोसळून एकाच दिवसात दीड डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. येथे, हवामान खात्याने अंदाज जारी केला आहे. ज्यामध्ये पुढील दोन दिवसांच्या हवामानाची माहिती आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची आणि अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.

बिहार हवामान सेवा केंद्राने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. किशनगंज, अररिया, सुपौल, कटिहार, पूर्णिया, मधुबनी, मधेपुरा, सहरसा, दरभंगा, सीतामढी, भागलपूर, पश्चिम चंपारण आणि पूर्व चंपारण जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

या जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याची शक्यता

तर पुढील २४ तासांत गया, नवादा, सासाराम, औरंगाबाद, बक्सर, जमुई, बांका, मुंगेर, भागलपुर, लखीसराय, शेखपुरा, समस्तीपुर, पटना, जहानाबाद, अरवल, नालंदा, मुजफ्फरपुर, पूर्वी चंपारण, सीतामढ़ी, दरभंगा, सीवान, सारण, गोपालगंज, किशनगंज, अररिया, मधुबनी आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकडाटासह वीज पडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com