Aditya Thackeray : “आपलं चिन्ह परिवर्तनाचं चिन्ह”; नाशिकमध्ये आदित्य ठाकरेचं महत्त्वाचं विधान

Aditya Thackeray : “आपलं चिन्ह परिवर्तनाचं चिन्ह”; नाशिकमध्ये आदित्य ठाकरेचं महत्त्वाचं विधान

“मुंबई महापालिकेत आम्ही करून दाखवलय. तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रात पण आहे. तुम्ही स्वतः केलेलं एक काम दाखवा. फक्त फोडाफोडी राजकारण तुम्ही केलं. जेवढं इन्कमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान कार्यकर्त्याना मान मिळेल.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

“मुंबई महापालिकेत आम्ही करून दाखवलय. तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रात पण आहे. तुम्ही स्वतः केलेलं एक काम दाखवा. फक्त फोडाफोडी राजकारण तुम्ही केलं. जेवढं इन्कमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान कार्यकर्त्याना मान मिळेल. भाजपाला आणि संघाला प्रश्न आहे. सगळे भ्रष्टाचारी लोक तुमच्या पक्षात आहेत. ज्यांच्यावर खोटे आरोप होतें ते आमच्याकडे आहेत. दागी लोकांना घेतले ते तुमच्याशी बोलून घेतले का? हे विचारा” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडं कापण्याच काम राक्षस करू शकतात. तुम्ही साधुग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज नाशिक दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विनायक पांडे यांनी 43 वर्षांच शिवबंधन तोडून भाजपत प्रवेश केला.

आदित्य ठाकरे यांनी साधुग्रामच्या नावाखाली जमिनी बिल्डरांच्या हातात देण्याचा आरोप करत म्हटले, “प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडं कापण्याचं काम राक्षस करू शकतात, तुम्ही साधुग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे.” भाजपाच्या हिंदुत्वाचे आणि रावणराज्याची तयारीचे आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, “भाजप रामराज्य नाही, तर रावण राज्य आणण्याच्या तयारीत आहे. शहराचे विद्रुपीकरण, गुन्हेगारी आणि महिलांवरील अन्याय याबाबत त्यांनी बोलावे. एका आमदारावर बलात्कार झाला तरी बेल मिळाली. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला?”\

आपलं चिन्ह परिवर्तनाच चिन्ह

“तपोवन वाचवायचे. महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील. भाजपाने फ़क्त कर वाढवला. आपण परिवर्तन घडवणार. आपलं चिन्ह परिवर्तनाच चिन्ह. युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात मिळेल” असं आदित्य म्हणाले.

आदित्य यांनी नाशिकमध्ये आपल्या विकास योजनाही मांडल्या. “मुंबईत उद्धव साहेबांनी चार मेडिकल कॉलेज उभारले. नाशिक महापालिकेत किमान एक मेडिकल कॉलेज आणणार आहोत. प्रत्येक वार्डात सुसज्ज शाळा आणि महिलांसाठी विनामूल्य बसेस पुरवणार आहोत. भाजपाने फक्त कर वाढवला. आम्ही परिवर्तन घडवणार आहोत. आपलं चिन्ह परिवर्तनाचं चिन्ह.” आदित्य ठाकरे यांनी युतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली, “युतीची गोड बातमी पुढच्या २४ तासात मिळेल,” अशी माहिती त्यांनी उपस्थितांना सांगितली. त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले की, आदित्य ठाकरेंची टीम नाशिकमध्ये राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी सक्रिय आहे आणि लोकांशी थेट संवाद साधत महत्त्वाचे मुद्दे मांडत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com