Gopichand Padalkar : पडळकरांच्या  'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ
Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोनGopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

राजकीय खळबळ: पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना नाराजी.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.

  • ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

  • पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा प्रकारच्या अशोभनीय वक्तव्यांना आवर घालावा.

Sharad Pawar directly calls the Chief Minister : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून आंदोलनाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा प्रकारच्या अशोभनीय वक्तव्यांना आवर घालावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा वापरणं योग्य नाही, असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते.

पडळकर यांनी टीकेदरम्यान जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांवरही अपमानास्पद टिप्पणी केली होती. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राष्ट्रवादी (पवार गट) मध्ये रोषाची लाट उसळली आहे. पक्षाकडून अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलनं उभारली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय वाद मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. मात्र यावेळी पडळकरांनी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या दर्जाची असल्याने या वादाला अधिक उग्र स्वरूप आलं आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे औपचारिक तक्रार नोंदवल्यानंतर आता राज्य सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com