Padma Bhushan : मनोहर जोशी आणि पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, खेळ, कला, साहित्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारमध्ये पद्म, पद्मभूषण, पद्माश्री अशा तीन पुरस्कारांचा समावेश आहे. यामधील ११ पद्मभूषण तर, ११ जणांना पद्मभूषण जाहीर झाला आहे.
मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर.....
मनोहर जोशी हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून झाली होती. त्यानंतर ते महापौर, आमदार आणि खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्री झाले होते. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिवंगत गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर.....
पंकज उधास यांनी वयाच्या ६ व्या वर्षी असताना गाणं गाण्यास सुरुवात केली होती. त्यांना गझलचे बादशाहा म्हटलं जाते. गायिका कविता पौडवाल यांच्या साथीने पंकज उधास यांनी 'रंगधनूचा झुला' नावाचे मराठी गाणे गायले होते. याआधी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. २०२५ या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.