Padma Bhushan : शेखर कपूर यांनी सोशलमिडियावर पोस्ट टाकत सरकारचे आभार मानले, " मी खूप भाग्यशाली आहे...........
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, खेळ, कला, साहित्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारमध्ये पद्म, पद्मभूषण, पद्माश्री अशा तीन पुरस्कारांचा समावेश आहे.
यामधील 11 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'बँडिट क्वीन', 'मिस्टर इंडिया', 'मासूम' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले आहेत. या 11 जणांमधील एक म्हणजे शेखर कपूर आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत x सोशलमीडियावर पोस्ट टाकत सरकारचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शेखर कपूर x सोशलमिडियावर पोस्ट करत म्हणाले कि " मी स्व:ताला खूप भाग्यशाली मानतो कि, सरकारने मला पद्मभूषणसाठी पात्र मानले आहे" असं म्हणत त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.