Maharashtra ZP Election 2026 : मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय
राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना सहजपणे मतदान करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे, त्या जिल्ह्यांतील मतदार जर इतर ठिकाणी नोकरी करत असतील, तरी त्यांना सुट्टी देणं बंधनकारक असेल. हा नियम खाजगी कंपन्या, कारखाने, आयटी क्षेत्र, दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि थिएटर्ससह सर्व व्यावसायिक आस्थापनांना लागू राहणार आहे.
कर्मचाऱ्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, याची जबाबदारी मालकांवर टाकण्यात आली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाने याबाबत स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रचार आज रात्री 10 वाजता थांबणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. लाखो मतदार आपला कौल देणार असून, अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
थोडक्यात
• जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय
• मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश
• मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण येऊ नये, हा निर्णयाचा उद्देश
• मतदान होणाऱ्या १२ जिल्ह्यांतील मतदारांना सुट्टी देणे बंधनकारक
• मतदार इतर जिल्ह्यात नोकरी करत असले तरी नियम लागू
• खाजगी कंपन्या, कारखाने, आयटी क्षेत्रावरही नियम लागू

