Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक, 6 सैनिकांनी हत्या, 100 प्रवासी ओलिस
पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स बलुच लिबरेशन आर्मीबने पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक केल्याचे वृत्त हाती आले आहे. बलोच आर्मीने ट्रेनमधील सर्व प्रवाशांना ओलिस ठेवले असल्याची माहिती बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर दिली आहे.
पाकिस्तानमध्ये जाफरा एक्सप्रेस क्वेटावरुन खैबर पख्तुनवा येथील पेशावर येथे जात होती. दरम्यान बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर माहिती देत लिहिले की, "मश्फक, धादर, बोलन या दरम्यान ही घटना घडली. या मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवले गेले आणि नंतर ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनला ताब्यात घेतले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व प्रवाशांना बंदी बनवण्यात आले आहे. जर पाकिस्तान किंवा कोणत्याही इतर सेनेने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला तर बंदी असलेल्यांना मारण्यात येईल असे सांगितले आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ६ सैनिकांची हत्या केली आहे.
बलूच आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, आतंकवादी विरोधी दल, आयएसआयचे अधिकारी प्रवास करत होते. दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान बीएलए आर्मीने ट्रेनमधील महिला, लहान मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले आहे. बीएलएचे फियादीन युनिट, मजिद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे.