IND vs PAK : पाकिस्तान कधी सुधारणार नाही;  केला नवा पराक्रम...
IND vs PAK : पाकिस्तान कधी सुधारणार नाही; केला नवा पराक्रम... IND vs PAK : पाकिस्तान कधी सुधारणार नाही; केला नवा पराक्रम...

IND vs PAK : पाकिस्तान कधी सुधारणार नाही; केला नवा पराक्रम...

Pakistan's new feat : भारताविरुद्ध पराभवानंतर पाक कर्णधाराची वादग्रस्त घोषणा, सामना फी दहशतवाद्यांच्या कुटुंबांना दान.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • भारताने आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तान पुन्हा मूळ रूपात 

  • दहशतवादाला दिला पाठिंबा 

  • मसूद अजहरला देणार जिंकलेली रक्कम 

IND vs PAK Asia Cup 2025 Final Match : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय नेते आणि कर्णधार सलमान अली आगा यांनी भारतीय संघावर आरोपांची सरबत्ती केली. पाक संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर भारताने क्रिकेटची संस्कृती उद्ध्वस्त केली असा आरोप केला, तर कर्णधार आगाने भारतीय संघाने हस्तांदोलन न केल्यामुळे क्रिकेटचा अपमान झाल्याचे म्हटले.

मात्र, याच पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधाराने मोठी घोषणा केली. संपूर्ण पाकसंघ आपली सामना फी पाकिस्तानवरील भारतीय स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या नागरिकांच्या नावाने दान करणार असल्याचे आगाने सांगितले. परंतु भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या लोकांचा मृत्यू झाला, ते प्रत्यक्षात सामान्य नागरिक नव्हते तर जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आणि मसूद अझहरचे नातेवाईक होते.

भारताच्या स्ट्राईकमध्ये जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. त्यात मसूद अझहरचे दोन मेव्हणे, कंधार हायजॅक प्रकरणात सहभागी युसुफ अझहर आणि बहावलपूरमधील जैश केंद्राचा प्रमुख मोहम्मद जमील अहमद ठार झाले. त्यांचा मुलगा हमजा जमील, काश्मीरमध्ये दहशतवादी कामकाज करणारा, तोही मारला गेला. तसेच मसूद अझहरचा दत्तक पुतण्या हुजैफा अझहर हाही ठार झाला, जो अफगाणिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे जैशची धुरा सांभाळत होता.

याशिवाय मुजफ्फराबादमधील मरकज बिलालचा प्रमुख याकूब मुगल, कमांडर असगर खानचा मुलगा हसन खान आणि त्याचा साथीदार वकास यांचा मृत्यू झाला. मुरिदकेतील लष्कर मुख्यालयात मुदस्सिर आणि अबू उकसा मारले गेले, जे दहशतवाद्यांना शस्त्र प्रशिक्षण देत होते. तरीदेखील पाक संघाची सामना फी या लोकांच्या कुटुंबासाठी देण्याची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध पुन्हा एकदा उघड झाला.

पाक क्रिकेट संघाचा दहशतवाद्यांवरील झुकाव काही नवीन नाही. पूर्वी इम्रान खान यांना तालिबानशी निकटतेमुळे ‘तालिबान खान’ म्हटले जात असे. आता परिस्थिती अशी आहे की साहिबजादा फरहान भारताविरुद्ध खेळताना अर्धशतकानंतर बंदुकीचा इशारा करतो आणि सलमान अली आगा सारखा कर्णधार संपूर्ण संघाची सामना फी दहशतवाद्यांच्या कुटुंबांना दान करण्याची उघड घोषणा करतो. हेच दाखवते की पाकिस्तानमध्ये खेळ आणि दहशतवाद हातात हात घालून चालतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com