Dehil Blast Update : दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तान घाबरले, सैन्याला सर्तक राहण्याचे आदेश
थोडक्यात
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर भारतात तणावाचे वातावरण निर्माण झाले
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती
दिल्ली स्फोटाच्या पाश्वर्भूमीवर सैन्याला सर्तक राहण्याचे आदेश
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर भारतात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा परिणाम पाकिस्तानवरही दिसू लागला आहे. स्फोटात 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीतील हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, तेथील लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सोमवारी रात्री सर्व संरक्षण दलांना हाय अलर्ट घोषित केल्याची माहिती मिळाली आहे. भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईची भीती व्यक्त करत पाकिस्तानने सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे.
पाकिस्तान सरकारने सर्व विमानतळे आणि एअरबेसवर रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच लष्कर, वायूदल आणि नौदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि उच्च पदस्थ अधिकारी दिल्लीतील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहेत. या स्फोटानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील हालचालींवर तणावाचे सावट पसरले असून, पुढील काही दिवस राजनैतिक आणि लष्करी पातळीवर महत्त्वाचे ठरू शकतात.

